IND vs BAN : त्या विकेटनंतर रोहित शर्माला बसला आश्चर्याचा धक्का, दिली अशी रिअ‍ॅक्शन Watch Video

भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना सुरु होण्यास उशीर झाला. या सामन्यात वेगवान गोलंदाज आकाश दीपची छाप दिसली. दुसरी विकेट तर इतकी भारी मिळाली की कर्णधार रोहित शर्मालाही विश्वास बसेना.

IND vs BAN : त्या विकेटनंतर रोहित शर्माला बसला आश्चर्याचा धक्का, दिली अशी रिअ‍ॅक्शन Watch Video
Image Credit source: video grab
Follow us
| Updated on: Sep 27, 2024 | 1:44 PM

भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. जवळपास 60 वर्षानंतर भारतीय कर्णधारने या मैदानात नाणेफेकीचा कौल जिंकला. कर्णधार रोहित शर्माला हा मान मिळाला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाज आकाश दीपचा प्रभाव दिसला. संघाच्या नवव्या आणि 13 व्या षटकात त्याने विकेट मिळवून दिली. झाकीर हसनला तर आपलं खातंही खोलता आलं नाही. त्याने 24 चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद होत तंबूत परतला. पण एका बाजूने शदमन इस्लाम चिवट झुंज देताना दिसत होता. त्याची विकेट काढण्यात आकाश दीपला यश आलं. कर्णधार रोहित शर्माने संघाचं 13वं षटक आकाश दीपकडे सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शदमन इस्लाम पायचीत असल्याची जोरदार अपील करण्यात आली. पण पंचांनी नकार दिल्याने आकाश दीपने कर्णधार रोहित शर्माकडे धाव घेतली. कसं बसं आकाश दीपने कर्णधार रोहित शर्माला समजावून रिव्ह्यू घेतला. पण जेव्हा तिसऱ्या पंचांचा निर्णय आला तेव्हा मात्र रोहित शर्मा खूपच खूश झाला.

तिसऱ्या पंचांनी जेव्हा रिप्ले पाहिला आणि बॉल ट्रॅकिंगमध्ये असं निदर्शनास आलं की चेंडू सरळ विकेटवर आदळत आहे. त्यामुळे पंचांनी मैदानातील पंचाचा निर्णय रद्द करून लाल बत्ती दिली. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माच्या आनंदाचा बांध फुटला. खऱ्या अर्थाने त्याला या विकेटसाठी आश्चर्य वाटलं. त्याची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात चित्रित झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, शदमन इस्लामचा खेळ 29 धावांवर संपुष्टात आला. त्याने यावेळी चार चौकार मारले होते.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शदमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'....
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'.....
फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?
फडणवीसांच्या कार्यालयची तोडफोड अन् नुकसान, महिलेनं का घातला गोंधळ?.
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती
महिलांनो...अजूनही वेळ गेलेली नाही, 'लाडकी बहीण योजने'बाबत मोठी माहिती.
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं
शिवरायांचा पुतळा कोसळला कसा? ही 4 कारण समोर, स्थानिक म्हणत होते ते खरं.
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण
अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार नाही, दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण.
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा
'डर्टी डझन'चा शेकहँड, शाह अन् मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुळेंचा निशाणा.
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.