IND vs BAN T20 : टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये मोठी चूक? आता ही जबाबदारी कोण निभावणार

| Updated on: Sep 29, 2024 | 2:11 PM

IND vs BAN T20 : बांग्लादेश विरुद्ध T20 सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या टीममध्ये एक मोठी कमतरता दिसून आलीय. या सीरीजची सुरुवात 6 ऑक्टोंबरला होणार आहे. त्यासाठी 15 सदस्यीय स्क्वॉडची घोषणा केली आहे.

IND vs BAN T20 : टीम इंडियाच्या सिलेक्शनमध्ये मोठी चूक? आता ही जबाबदारी कोण निभावणार
Team India
Image Credit source: PTI
Follow us on

भारत आणि बांग्लादेशमध्ये येत्या 6 ऑक्टोंबरपासून तीन सामन्यांची T20 सीरीज सुरु होणार आहे. या सीरीजसाठी बीसीसीआयने स्क्वॉडची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय स्क्वॉडची निवड करण्यात आली आहे. यात अनेक युवा खेळाडू आहेत. पण टीम इंडियाच्या या स्क्वॉडमध्ये एक मोठी कमतरता आहे. T20 सीरीजमध्ये ही कमतरता टीम इंडियाला भारी पडू शकते.

या सीरीजसाठी निवडलेल्या टीममध्ये नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि मयंक यादव सारख्या युवा खेळाडूंची निवड झाली आहे. हार्दिक पांड्या, शिवम दुबे सारखे स्टार खेळाडू सुद्धा टीमचा भाग आहेत. पण नियमित ओपनर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांना या सीरीजसाठी आराम देण्यात आलाय. अभिषेक शर्माचा ओपनर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आलाय. पण त्याच्यासोबत ओपनिंगला कोण येणार? हा मोठा प्रश्न आहे. टीमकडे त्याच्याशिवाय दुसरा रेग्युलर ओपनर नाहीय.

ओपनर म्हणून कामगिरी कशी?

या सीरीजमध्ये अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन ओपनिंगला येऊ शकतो. संजू सॅमसनकडे ओपनिंगचा जास्त अनुभव नाहीय. टीम इंडियासाठी सॅमसनने आतापर्यंत पाच सामन्यात ओपनिंग केलीय. सॅमसनला ओपनर म्हणून फक्त 105 धावा करता आल्या आहेत. यात 77 रन्सची इनिंग आहे. आयर्लंड विरुद्ध त्याने या धावा केलेल्या. टीम इंडियासाठी श्रीलंकेविरुद्ध त्याने ओपनिंग केलेली. त्यावेळी शुन्यावर बाद झाला होता. टीम इंडियाच्या या स्क्वॉडमध्ये संजू सॅमसनसह जितेश शर्मा सुद्धा आहे.

बांग्लादेश विरुद्ध टी20 सीरीजसाठी टीम इंडिया

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि मयंक यादव.