IND vs NZ T20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, केन विल्यमसन संघाबाहेर, अनुभवी गोलंदाजाकडे नेतृत्व

| Updated on: Nov 16, 2021 | 1:32 PM

न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीचा संघ जाहीर केला आहे. या संघाशी संबंधित मोठी बातमी म्हणजे या संघात कर्णधार केन विल्यमसनचा समावेश केलेला नाही.

IND vs NZ T20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, केन विल्यमसन संघाबाहेर, अनुभवी गोलंदाजाकडे नेतृत्व
Kane Williamson
Follow us on

मुंबई : न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीचा संघ जाहीर केला आहे. या संघाशी संबंधित मोठी बातमी म्हणजे या संघात कर्णधार केन विल्यमसनचा समावेश केलेला नाही. केन टी-20 मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी टीम साऊदीकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. केन विल्यमसन दुखापतीमुळे नव्हे तर कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, जी 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल, त्यामुळेच केन विल्यमसनने त्याला महत्त्व देण्यासाठी टी-20 मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs NZ: Kane Williamson To Miss T20I Series Against India, Tim Southee To Lead New Zealand In 1st Match)

न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी 14 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात 5 वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. तर फिरकी विभागाची जबाबदारी मिचेल सँटनर आणि ईश सोढी यांच्या खांद्यावर आहे. टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन ही वेगवान गोलंदाजीतील चार प्रमुख अस्त्र टीम न्यूझीलंडकडे असतील. तर काईल जेमिसन अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडणार आहे.

मार्टिन गप्टिलकडे फलंदाजीचे नेतृत्व

केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत फलंदाजीची जबाबदारी अनुभवी मार्टिन गप्टिलच्या खांद्यावर असेल. याशिवाय डॅरेल मिशेल, टिम सायफर्ट, ग्लेन फिलिप्स हे फलंदाज देखील संघात असतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना जयपूरमध्ये झाल्यानंतर दुसरा सामना रांचीमध्ये आणि तिसरा सामना कोलकातामध्ये होईल. टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 21 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर संघ कानपूरहून कोलकात्याला रवाना होईल.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ : मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, टिम सायफर्ट, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जिमी निशम, काईल जेमिसन, टॉड अॅस्टले, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि ईश सोढी

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

इतर बातम्या

विश्वचषक स्पर्धा संपली, आता रंगणार भारत-न्यूझीलंड सामने, संपूुर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

बांग्लंदेशविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 4 खेळाडूंना बाहेरचा रस्ता

हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त

(IND vs NZ: Kane Williamson To Miss T20I Series Against India, Tim Southee To Lead New Zealand In 1st Match)