IND vs ENG: Deepti sharma ला कॅप्टनचा फुल सपोर्ट, वाद उकरणाऱ्या इंग्रजांचा अश्विनकडून समाचार
IND vs ENG: दीप्तीच्या हुशारीमुळे टीम इंडियाने सामना जिंकला. पण हा विजय इंग्रजांच्या जाम जिव्हारी लागलं
मुंबई: महिला टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची वनडे सीरीज क्लीन स्वीप केली. टीम इंडियाने 3-0 अशी ही सीरीज जिंकली. या विजयासह टीमने दिग्गज गोलंदाज झूलन गोस्वामीला स्मरणात राहील, असा निरोप दिला. सीरीजमधील तिसरी मॅच टीम इंडियाने 16 धावांनी जिंकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने इंग्लिश टीमला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिले होते.
या विकेटसह दीप्तीने सामना संपवला
प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 153 धावात आटोपला. 4 विकेट घेणारी रेणुका सिंह सामनवीर पुरस्काराची मानकरी ठरली. टीम इंडियाच्या या विजयानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती, दीप्ती शर्माची. तिने शानदार फॉर्ममध्ये असलेल्या चार्ली डीनला मांकडिंगने बाद केलं. या विकेटसह दीप्तीने सामना संपवला.
हा खेळाचा नियम
“चार्लीच्या रुपाने इंग्लंडचा शेवटचा विकेट गेला. तिने 47 धावा केल्या. दीप्तीने रनआऊट घेतल्यानंतर आता वाद सुरु झाला आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौरने दीप्ती शर्माला सपोर्ट केला. “दीप्तीने नियम मोडून काहीही केलेलं नाही. हा खेळाचा नियम आहे. आम्ही काही नवीन केलय असं मला वाटत नाही. यातून तुमची जागरुकता दिसून येते” असं हरमनप्रीत म्हणाली.
Why the hell are you trending Ashwin? Tonight is about another bowling hero @Deepti_Sharma06 ??
— Ashwin ?? (@ashwinravi99) September 24, 2022
अश्विन म्हणाला, आजची हीरो
दीप्तीला ट्रोल करणाऱ्यांचा टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आर.अश्विनने आपल्या स्टाइलमध्ये समाचार घेतला. अश्विनने एक टि्वट केलं. “अश्विनला कोण ट्रेंड करतोय? आज आणखी एक बॉलिंग हिरो मिळालाय दीप्ती शर्मा” असं अश्विनने त्याच्या टि्वटमध्ये मह्टलं आहे.
आयपीएलमध्ये अश्विनने इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरला मांकडिंगने आऊट केलं होतं. त्यानंतर खिलाडू वृत्तीचा वाद सुरु झाला होता. दीप्तीच्या मांकडिंगनंतर पुन्हा एकदा तो वाद सुरु झालाय. दीप्तीने या मॅचमध्ये एक विकेट काढली. शेवटचा सामना खेळणाऱ्या झूलनने 30 धावात 2 विकेट काढल्या.