Rohit sharma Mumbai Indians: ‘हा काय प्रश्न झाला? मी भाई…’ पत्रकाराच्या प्रश्नावर खवळला रोहित शर्मा

Rohit sharma Mumbai Indians: रोहित शर्मा (Rohit sharma) इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यशस्वी कॅप्टन आहे. तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्यासाठी तयार आहे.

Rohit sharma Mumbai Indians: 'हा काय प्रश्न झाला? मी भाई...' पत्रकाराच्या प्रश्नावर खवळला रोहित शर्मा
IPL 2022: रोहित शर्मा-माहेला जयवर्धने Image Credit source: MI Video Screenshot
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 3:18 PM

मुंबई: रोहित शर्मा (Rohit sharma) इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यशस्वी कॅप्टन आहे. तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्यासाठी तयार आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. यंदा सहावं जेतेपद मिळवण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल. मैदानावर उतरण्याआधी रोहित शर्मा नेट्समध्ये जोरदार मेहनत घेत आहे. आपल्या नव्या संघासाठी रणनिती आखत आहे. रोहितने मुंबई इंडियन्सच्या पाचही विजेतेपदांमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. मुंबईच्या टीमला एका उंचीवर घेऊन जाण्यात रोहितची महत्त्वाची भूमिका आहे. रोहित शर्मा बुधवारी पत्रकार परिषदेला सामोरा गेला. रोहितला या पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. तो ऐकून रोहित चक्रावून गेला. रोहित शर्माला बॅटिंग ऑर्डरबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

त्या प्रश्नावर रोहित खवळला

तू कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करणार? असा प्रश्न रोहितला विचारला. हा प्रश्न रोहितला पटला नाही. तो खवळला. ‘हा काय प्रश्न झाला?’ असा प्रतिप्रश्न त्याने केला. “मी ओपनिंग करतोय भाई. इशान किशन सोबत मी सलामीला येणार आहे” असं रोहितने सांगितलं. रोहित शर्माने आयपीएलमध्ये नंबर चारवर सुद्धा फलंदाजी केली आहे. सध्या तो ओपनिंगच्या मूडमध्ये आहे. टी 20 मध्ये ओपनर म्हणून त्याचा रेकॉर्ड कमालीचा आहे. रोहितने आयपीएलमध्ये अजून एकही शतक झळकावलेलं नाही. पण टी 20 मध्ये त्याने चार शतकं झळकावली आहेत. मुंबईला आपल्या कर्णधाराकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल.

IPL 2022 सूर्यकुमार यादव कधी खेळणार?

सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबद्दलही रोहित शर्माने माहिती दिली. जो पर्यंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून सूर्यकुमार यादवला ग्रीन सिग्नल मिळणार नाही, तो पर्यंत तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार नाही. “सूर्यकुमार यादव एनसीएमध्ये आहे. तो कधी संघात दाखल होतोय, त्याची आम्ही वाट पाहतोय. त्याला एनसीएकडून परवानगी मिळाल्यानंतर सूर्यकुमार टीममध्ये येईल”

रोहित शर्मा प्रत्येक सामना खेळणार

रोहित शर्माने आपल्या वर्कलोडबद्दलही महत्त्वाची गोष्ट सांगितली. आयपीएल 2022 मध्ये मला प्रत्येक सामना खेळायचा आहे. “मला प्रत्येक सामना खेळायची इच्छा आहे. वर्कलोडची समस्या निर्माण झाली, तर आम्ही ती मॅनेज करु”

मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेवन काय असेल?

कोच माहेला जयवर्धने यांना मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेवनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मुंबईने अजून आपली प्लेइंग इलेवन निश्चित केलेली नाही. “आम्ही आमची प्लेइंग इलेवन निश्चित केलेली नाही. डेवाल्ड ब्रेविस नेट्समध्ये दमदार फलंदाजी करतोय आणि बरंच काही शिकतोय” असं त्यांनी सांगितलं.

मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला.
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.