IPL 2024 Point Table : तीन सामन्यानंतर गुणतालिकेत वर खाली, कोण टॉपला कोण तळाशी ते जाणून घ्या

| Updated on: Mar 23, 2024 | 11:46 PM

आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने पार पडले आहे. यात तीन संघांनी विजय, तर तीन संघांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स यांनी विजय मिळवला. तर दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

IPL 2024 Point Table : तीन सामन्यानंतर गुणतालिकेत वर खाली, कोण टॉपला कोण तळाशी ते जाणून घ्या
Follow us on

आयपीएल स्पर्धेला आता खऱ्या अर्थाने रंगत चढण्यास सुरुवात झाली आहे. तीन सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. तीन संघांच्या पारड्यात प्रत्येकी दोन गुणांची कमाई झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पण असं असलं तरी या तीन संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा संघ अव्वल स्थानी राहिला आहे. कारण या संघाचा रनरेट जबरदस्त राहिला आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 173 धावा केल्या आणि विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान चेन्नईने 6 गडी आणि 8 चेंडू राखून पूर्ण केलं. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाब किंग्सने हे आव्हान 4 गडी आणि 4 चेंडू राखून पूर्ण केलं.

स्पर्धेतील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करत 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान गाठण्याचा हैदराबादने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र पदरी अपयश पडलं. शेवटच्या क्षणी 4 धावा कमी पडल्या. 6 चेंडूत 13 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार मारला. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव आली. तिसऱ्या चेंडूवर शहाबाज अहमद बाद झाला.चौथ्या चेंडूवर जानसेनने एक धाव घेतली. पाचव्या चेंडूवर क्लासेन बाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर पाच धावांची अवश्यकता असताना पॅट कमिन्स मैदानात उतरला. पण हा चेंडू निर्धाव गेला.

संघसामनेविजय पराजयनेट रनरेटगुण
राजस्थान रॉयल्स330+1.249 6
कोलकाता नाईट रायडर्स220+1.0474
चेन्नई सुपर किंग्स 3210.9764
गुजरात टायटन्स321-0.7384
सनरायझर्स हैदराबाद312+0.2042
लखनऊ सुपर जायंट्स2110.0252
दिल्ली कॅपिटल्स212-0.016 2
पंजाब किंग्स3120.3372
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु312-0.7112
मुंबई इंडियन्स 303-1.4230

चेन्नई सुपर किंग्स 2 गुण आणि 0.779 रनरेटसह अव्वल स्थानी, पंजाब किंग्स 2 गुण आणि 0.455 रनरेटसह दुसऱ्या, कोलकाता नाईट रायडर्स 2 गुण आणि 0.200 रनरेटसह तिसऱ्या स्थानी राहिला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु -0.779 रनरेटसह सर्वात शेवटी, -0.455 रनरेटसह नवव्या आणि -0.200 रनरेटसह आठव्या स्थानी आहे. आता रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा यात उलथापालथ होईल.