IND vs PAK World Cup 2023 | पाकिस्तान विरुद्ध रोहित शर्मा मुख्य गोलंदाजाला बसवून मोहम्मद शमीला खेळवणार ?

IND vs PAK World Cup 2023 | रोहित शर्माने असा निर्णय घेतला, तर त्यामागे काय कारण असेल?. मोहम्मद शमीला पाकिस्तान विरुद्ध खेळवण्याचा काय फायदा आहे? वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान या बहुचर्चित सामन्याला आता फक्त एकदिवस उरलाय.

IND vs PAK World Cup 2023 | पाकिस्तान विरुद्ध रोहित शर्मा मुख्य गोलंदाजाला बसवून मोहम्मद शमीला खेळवणार ?
रोहितने वर्ल्ड कपमध्ये वेगवान 1 हजार धावांच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नर याच्या विक्रमाची बरोबरी साधली. रोहितला वॉर्नर इतक्याच 19 डावानंतर 1 हजार धावांपार मजल मारता आली.
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 11:57 AM

अहमदाबाद : टीम इंडियाला वर्ल्ड कपमधला पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळायचा आहे. टीम इंडियासाठी हा खूप महत्त्वाचा सामना आहे. टीम इंडिया कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. मायदेशात पाकिस्तान विरुद्ध पराभव स्वीकारायचा नाही, हाच टीम इंडियाचा उद्देश असेल. टीम इंडिया अजूनपर्यंत तरी वनडे वर्ल्ड कपमध्ये एकदाही पाकिस्तान विरुद्ध हरलेली नाही. हाच विजयी सिलसिला पुढे चालू ठेवायचा आहे. 1992 पासून टीम इंडिया सातत्याने वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध जिंकत आली आहे. रोहित शर्मा आपल्या नेतृत्वाखाली हा रेकॉर्ड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या मॅचसाठी रोहित शर्माला टीमच्या प्लेइंग 11 बद्दल काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मोहम्मद सिराज टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केलय.

वनडे रँकिंगमध्ये तो नंबर 1 गोलंदाज होता. पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी मोहम्मद सिराजला प्लेइंग 11 बाहेर बसवलं जाऊ शकतं. रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये सिराजच्या जागी मोहम्मद शमीला संधी देऊ शकतो. त्याच्यामागे काही कारण आहेत. मोहम्मद शमी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळतो. तो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आयपीएलमधील गुजरात टायटन्स टीमचे हे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे मोहम्मद शमीला या पीचवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. पाकिस्तानला वेसण घालण्यात शमी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मोहम्मद शमी टीममध्ये का हवा?

या पीचवर कशी गोलंदाजी करायची ? हे शमीला चांगल ठाऊक आहे. पाकिस्तानी फलंदाजांना मोहम्मद शमी अडचणीत आणू शकतो. त्यामुळे मोहम्मद शमीचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न असेल. रोहित शर्मा मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला का खेळवणार?. सिराजच अलीकडच्या काही सामन्यातील प्रदर्शन हे सुद्धा त्यामागे एक कारण आहे. सिराजने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये दमदार गोलंदाजी केली होती. श्रीलंके विरुद्ध 6 विकेट घेतले होते. पण त्यानंतर सिराजच्या प्रदर्शनाचा ग्राफ घसरलाय. त्यानंतर त्याने तीन सामन्यात फक्त एक विकेट घेतलाय. इतकच नाही, त्याची इकॉनमी सुद्धा बिघडलीय. त्याने भरपूर धावा दिल्यात. हे पाहता रोहित सिराजला प्लेइंग इलेव्हन बाहेर करु शकतो आणि त्याजागी शमीला संधी देईल.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.