PAK vs ENG: अरे बापरे! Pakistan टीमच्या प्रॅक्टिसवेळी मोठी दुर्घटना टळली, थोडक्यात वाचला नसीम शाह, पहा VIDEO
PAK vs ENG: पाकिस्तानचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज नसीम शाहबरोबर ही दुर्घटना घडली असती.नसीम शाहला भयानक मार लागला असता, पण...
मुंबई: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. कारण क्रिकेटच्या मैदानात कधी, कुठल्याक्षणी मॅच फिरेल हे कोणी सांगू शकत नाही. त्याचवेळी क्रिकेट खेळताना दुखापत होण्याचा धोकाही तितकाच असतो. लाइव्ह मॅच किंवा प्रॅक्टिस दरम्यान खेळाडूंना दुखापती झाल्याचं आपण पाहिलं आहे. पाकिस्तान टीमची शनिवारी कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर प्रॅक्टिस सुरु होती.
त्यावेळी एक मोठी दुर्घटना टळली. पाकिस्तानचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज नसीम शाहबरोबर ही दुर्घटना घडली असती. यात त्याच्या कानाला जबर मार लागला असता. पण त्याने कसंबसं स्वत:ला वाचवलं. तो फटका चुकवला.
ट्रेनिंगमध्ये 7 पाकिस्तानी प्लेयर्स सहभागी
पाकिस्तान टीमसाठी ही ट्रेनिंग ऑप्शनल होती. त्यामुळे सर्वच खेळाडू या ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी झाले नव्हते. फक्त 7 पाकिस्तानी खेळाडू या ट्रेनिंग सेशनमध्ये होते. यात नसीम शाहशिवाय खुशदिल शाह, आसिफ अली, शान मसूद, मोहम्मद हॅरिस, अबरार अहमद, आमेर जमाल सहभागी झाले होते.
खुशदिलच्या फटक्यावर वाचला नसीम
नेट्समध्ये नसीम शाह पाकिस्तानचा मिडल ऑर्डरमधील फलंदाज खुशदिल शाहला गोलंदाजी करत होता. त्याचवेळी नसीमने टाकलेल्या चेंडूवर खुशदिलने जोरदार फटका खेळला. प्रचंड वेगात नसीमच्या कानाजवळून चेंडू गेला. नसीमने अगदी शेवटच्या क्षणी चेंडूच्या लाइनमधून आपलं डोकं बाजूला केलं. अन्यथा जबर मार लागला असता.
View this post on Instagram
पहिल्या 3 टी 20 सामन्यासाठी नसीम शाहला आराम
नसीम शाहला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या तीन टी 20 सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती. चौथ्या टी 20 सामन्यात संघात त्याच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये टी 20 चा चौथा सामना 25 सप्टेंबरला कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. कराचीमध्येच या सीरीजचा शेवटचा सामना होणार आहे.