तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागले. पाकिस्तानने सर्व गडी बाद 149.5 षटकात 329 धावा केल्या आणि विजयासाठी 330 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही दक्षिण अफ्रिकेला गाठता आलं नाही. दक्षिण अफ्रिकेचा संघ 43.1 षटकात सर्व गडी बाद 248 धावा करू शकला आणि 81 धावांनी पराभूत झाला. हा सामना जिंकून पाकिस्तानने मालिका खिशात घातली. पण क्लासेनने दक्षिण अफ्रिकेच्या विजयासाठी कडवी झुंज दिली. 74 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 97 धावा केल्या. पण त्याची ही खेळी व्यर्थ गेली. पण सामन्यात एक प्रसंग असा आला होता की पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि हेनरिक क्लासेन एकमेकांसमोर उभे ठाकले आणि वादावादी सुरु झाली. त्यामुळे हे प्रकरण सोडवण्यासाठी पंच आणि खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला.
दक्षिण अफ्रिकेच्या डावात 26वं षटक पाकिस्तानकडून मोहम्मह हारिस रउफ टाकत होता. आखुड टप्प्याचा एक चेंडू हेनरिक क्लासेनने सोडला. त्यानंतर हारिस रउफने क्लासेनला डिवचलं आणि काहीतरी बोलला. त्यावर क्लासेनने प्रत्युत्तर दिलं. या वादात पाकिस्तानचा विकेटकीपर कर्णधार मोहम्मद रिझवानही उतरला. त्यावर क्लासेन आणि मिलरने रिझवानला काहीतरी बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. क्लासेनचा रोष पाहून पंच आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम यांनी धाव घेत प्रकरण शांत केलं.
— HaSsan (@finee_leg) December 19, 2024
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले फेहलुकवायो, ब्योर्न फोर्टुइन, क्वेना माफाका, तबरेझ शम्सी.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), कामरान गुलाम, सलमान आगा, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद