रोहित शर्माला डावललं, तर कोहलीला केलं कॅप्टन! उपांत्य फेरीपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खेळी

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु आहे. या दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम ऑफ वर्ल्डकपसाठी 11 खेळाडूंची निवड केली आहे. यात 4 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. पण रोहित शर्माला वगळण्यात आलं आहे.

रोहित शर्माला डावललं, तर कोहलीला केलं कॅप्टन! उपांत्य फेरीपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची खेळी
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केली वर्ल्डकप टीम! भारताचे चार खेळाडू, पण रोहित शर्माला वगळलं
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 3:00 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व सामने संपले असून चार संघांची उपांत्य फेरीत वर्णा लागली आहे. भारत, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. चारही संघांसाठी जेतेपद अवघे दोन विजय दूर आहे. या चार संघापैकी कोणता संघ जेतेपद पटकावतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टीम ऑफ वर्ल्डकप 2023 साठी 11 खेळाडूंची निवड केली आहे. भारताच्या 4 खेळाडूंना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या टीम ऑफ वर्ल्डकप संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा संघात समावेश आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला या संघात स्थान मिळालेलं नाही. इतकंच काय तर या संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेली टीम ऑफ वर्ल्डकप 2023

सलामीसाठी क्विंटन डिकॉक आणि डेविड वॉर्नर यांची वर्णी लागली आहे. तर वन डाऊन खेळीसाठी न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला पसंती देण्यात आली आहे. चौथ्या क्रमांकावर विराट कोहली उतरेल. तसेच त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. मधल्या फळीत एडन मार्करम आणि ग्लेन मॅक्सवेलला संधी दिली आहे. तर मार्को जानसन आणि रवींद्र जडेजा यांना अष्टपैलू म्हणून स्थान मिळालं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांची निवड करण्यात आली आहे. तर एडम झाम्पाकडे फिरकीची जबाबदारी अले. या व्यतिरिक्त श्रीलंकेच्या दिलशान मदुशंका यांची 12 वा खेळाडू म्हणून निवड केली आहे.

या संघात रोहित शर्माची निवड न झाल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत. या स्पर्धेत डेविड वॉर्नरच्या तुलनेत रोहित शर्माने अधिक धावा केल्या आहेत. तसेच रोहित शर्माचा एव्हरेज आणि सरासरीही त्याच्यापेक्षा उत्तम आहे. रोहित शर्मा याने 2023 वर्ल्डकपमध्ये 55.89 च्या सरासरीने आणि 121.50 च्या स्ट्राईक रेडने 503 धावा केल्या आहेत. तर डेविड वॉर्नरने 55.44 च्या सरासरी आणि 105.50 च्या स्ट्राइक रेटने 499 धावा केल्या आहेत. रोहितच्या तुलनेत वॉर्नरचं एक शतक अधिक आहे. या वर्ल्डकपमध्ये रोहितने 1, तर वॉर्नरने दोन शतकं ठोकली आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची टीम ऑफ वर्ल्ड कप

क्विंटन डीकॉक, डेविड वार्नर, रचिन रवीन्द्र, विराट कोहली (कर्णधार), एडन मार्करम, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जान्सेन, रवीन्द्र जडेजा, मोहम्मद शमी, एडम झाम्पा, जसप्रीत बुमराह, दिलशान मधुसंका (रिझर्व्ह प्लेयर)

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.