मुंबई : भारतीय टीमचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा हा अत्यंत महत्वपूर्ण दौरा मानला जात आहे. मात्र या दौऱ्याआधी टीमची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारताचा नवा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे ही बाब टीमची चिंता वाढवणारी आहे. रोहित शर्मा फक्त वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधारच नाही, तर तो कसोटी टीमचा उपकर्णधारही आहे. त्यामुळे त्याचे फिट राहणे अत्यंत गरजेचे आहे.
सरावादरम्यान हाताला दुखापत
रोहित शर्मा सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी तो खूप ट्रनिंगही करत आहे. याच सरावादरम्यान थ्रो डाऊन स्पेशालिस्ट राघवेंद्र यांचा चेंडू थेट रोहित शर्माच्या हातावर जाऊन लागला. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्टपासून सुरू होत आहे. त्यासाठी भारतीय टीम 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. आणि अशातच रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने चिंता वाढली आहे.
रोहितला झालेली दुखापत किती गंभीर?
रोहितला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे अजून कळालेले नाही. अशीच दुखापत अजिंक्य राहणेलाही 2016 साली झाली होती. त्यात त्याच्या बोटाचे हाड तुटले होते. रोहित शर्माचे पुन्हा लवकर फिट होणे गरजेचे आहे. रोहितकडे फिट होण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी असणार आहे. कारण भारताला पहिली कसोटी खेळण्यासाठी केवळ दोन आठवड्यांचा वेळ उरला आहे. जर रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यापर्यंत फिट नाही झाला, तर मयंक आग्रवाल आणि के. एल. राहुल भारतीय डावाची सुरूवात करू शकतात. सध्या रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याची टीमला सध्या जास्त गरज आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनंतर रोहितने दुसऱ्या स्थानी सर्वात जास्त धावा बनवल्या आहेत.