Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरला झटका, रणजी टीममधून डच्चू का? VIDEO
Arjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकर सध्या कुठे आहे? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. कारण IPL 2023 नंतर अर्जुन तेंडुलकर Action मध्ये दिसलेला नाही. अर्जुन कुठल्या टीममधून रणजी सामने खेळणार? हा सुद्धा प्रश्न आहे.
मुंबई : अर्जुन तेंडुलकर कुठे आहे? हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. प्रश्न पडणही स्वाभाविक आहे, कारण आयपीएल 2023 नंतर अर्जुन तेंडुलकर मैदानावर दिसलेला नाही. आयपीएल 2023 मध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्ससाठी चार मॅच खेळला. त्यानंतर अर्जुन कुठलाही प्रोफेशनल सामना खेळलेला नाही. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर कुठे आहे? असा प्रश्न विचारला जातोय.
आता अर्जुनने मैदानावर पुनरागमन केलय. मैदानावर अर्जुन अजून उतरलेला नाहीय. पण त्याने आपला एक व्हिडिओ पोस्ट करुन फॅन्सना अपडेट दिलीय.
अर्जुन तेंडुलकरचा खतरनाक चेंडू
अर्जुन तेंडुलकरने मंगळवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात तो धारदार गोलंदाजी करताना दिसतोय. अर्जुनने एका फलंदाजाला बाऊन्सर टाकला. तो चेंडू खेळताना फलंदाज आऊट झाला. अर्जुनचा हा चेंडू इतका खतरनाक होता की, फलंदाजाला सावरण्याची सुद्धा संधी मिळाली नाही. अर्जुनच्या या व्हिडिओवर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने कमेंट केलीय. युवराज सिंहने अर्जुनच्या व्हिडिओवर BOMB ची इमोजी पोस्ट केलाय.
अर्जुन सध्या कुठल्या टुर्नामेंटमध्ये खेळतोय?
अर्जुन तेंडुलकर सध्या देवधर ट्रॉफीसाठी साऊथ झोनच्या टीममध्ये आहे. साऊथ झोनने पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. नॉर्थ झोनच्या टीमचा टीकाव लागला नाही. या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली नाही. अर्जुनला पुढच्या सामन्यात संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
अर्जुन तेंडुलकरला झटका?
अर्जुन तेंडुलकरला इंडिया A मध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण असं झालं नाही. इंडिया ए ची टीम इमर्जिंग आशिया कपसाठी श्रीलंकेला गेली होती. फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाला. अर्जुन तेंडुलकरला गोव्याच्या टीममधून सुद्धा संधी मिळाली नाही. रणजी ट्रॉफीच्या पुढच्या सीजनसाठी गोव्याने आपल्या संभाव्य खेळाडूंची लिस्ट जारी केली आहे. यात अर्जुनच नाव नाहीय. अर्जुन तेंडुलकर पुढच्या सीजनमध्ये दुसऱ्या कुठल्या टीमकडून रणजी सीजन खेळणार? हा प्रश्न आहे.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सकडून खेळताना कशी होती कामगिरी?
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये अर्जुन तेंडुलकरला डेब्युची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सने अर्जुनला 4 मॅचमध्ये संधी दिली. त्यात त्याने 3 विकेट घेतले. अर्जुनच्या गोलंदाजीचा इकोनॉमी रेट प्रतिओव्हर 10 रन्स होता. त्याने आपल्या स्विंग गोलंदाजीने प्रभावित केलं होतं.