10 SIX, 6 फोर, तुफानी शतक, रचला इतिहास, भारतीय खेळाडूचा मोडला रेकॉर्ड VIDEO

| Updated on: Sep 27, 2024 | 9:12 AM

त्याने अवघ्या 38 चेंडूत 263 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 100 धावा ठोकल्या. यात 10 सिक्स आणि 6 फोर आहेत. जॉर्ज मुन्से फलंदाजीसाठी आला. मुन्सेने मैदानात येताच आक्रमक फलंदाजी सुरु केली.

10 SIX, 6 फोर, तुफानी शतक, रचला इतिहास, भारतीय खेळाडूचा मोडला रेकॉर्ड VIDEO
george munsey
Image Credit source: X/ZimAfroT10
Follow us on

स्कॉटलँडचा जॉर्ज मुन्से ‘जिम एफ्रो टी10 लीग’मध्ये शतक झळकवणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्याने अवघ्या 38 चेंडूत 263 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 100 धावा ठोकल्या. यात 10 सिक्स आणि 6 फोर आहेत. या तुफानी खेळीनंतरही जॉर्ज मुन्से टी 10 च्या फॉर्मेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवण्याचा रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरला. टी 10 मध्ये सर्वाधिक वेगवान शतकाचा रेकॉर्ड इंग्लंडच्या विल जॅक्सच्या नावावर आहे. वर्ष 2023 मध्ये विलने अवघ्या 25 चेंडूत हा कारनामा केला होता. पण 31 वर्षाच्या मुन्सेने भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पाचा रेकॉर्ड जरुर मोडला.

झिम्बाब्वेमध्ये जिम एफ्रो टी10 लीगची दुसरी एडीशन सुरु आहे. 26 सप्टेंबरला या सीजनचा 16 वा सामना हरारे बोल्ट्स आणि डर्बन वुल्व्समध्ये खेळला गेला. मुन्सने यावेळी अवघ्या 38 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. या लीगमध्ये शानदार शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. रॉबिन उथप्पाला मागे सोडून या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. उथप्पाने पहिल्या सीजनमध्ये 36 चेंडूत 88 धावा फटकावल्या होत्या. या लीगमधली ही सर्वाधिक व्यक्तीगत धावसंख्या होती. हा रेकॉर्ड आता मोडला आहे.

10 ओव्हरमध्ये किती धावा फटकावल्या?

डर्बनने टॉस जिंकून हरारेला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी बोलवलं. हरारेच्या टीमने दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला विकेट गमावला. त्यानंतर जॉर्ज मुन्से फलंदाजीसाठी आला. मुन्सेने मैदानात येताच आक्रमक फलंदाजी सुरु केली. त्याने अवघ्या 38 चेंडूत शतक ठोकलं. त्याच्या या शतकाच्या बळावर हरारे टीमने 10 ओव्हरमध्ये विजयासाठी 174 धावांच लक्ष्य ठेवलं.


कोण जिंकलं?

डर्बनच्या ओपनर्सनी चेज करताना चांगली सुरुवात केली होती. टीमने 2 ओव्हरमध्ये 36 धावा ठोकल्या. पण पहिला विकेट गेल्यानंतर टीम त्या धक्क्यातून सावरु शकली नाही. डर्बनची टीम डोंगराएवढ्या लक्ष्याच्या दबावाखाली आली. ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. 10 ओव्हरमध्ये संपूर्ण टीमने 6 विकेट गमावून 119 धावा केल्या. हरारेच्या टीमने आरामात हा सामना 54 धावांनी जिंकला. या विजयासह टीमने 6 पैकी 5 सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.