इंदूर | इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल सलामी जोडी बॅटिंगसाठी आली. मात्र ऋतुराजला पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आलं. ऋतुराज अवघ्या 8 धावांवर आऊट झाला.
ऋतुराजनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. श्रेयस आणि शुबमन या दोघांनी तिथूनच कांगारुंना उपट द्यायला सुरुवात केली. पावरप्लेमधील 10 ओव्हरमध्ये गिल-अय्यरने फटकेबाजी करत टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना बॅटने हाणामारी सुरुच ठेवली. या दरम्यान गिल-श्रेयसने अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतर दोघांनी टॉप गिअर टाकला. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे शुबमन आणि श्रेयस दोघांपैकी आधी शतक कोण मारणार अशी स्पर्धा झाली. मात्र श्रेयसने यात बाजी मारली.
श्रेयसने 86 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 10 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. श्रेयसने 116 च्या स्ट्राईक रेटने हे शतक ठोकलं. श्रेयसच्या वनडे कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. श्रेयस शतक ठोकल्यानंतर आऊट झाला. मात्र गोलंदाजाने अर्धवट कॅच पकडल्याने त्याला नाबाद घोषित केलं. त्यानंतर श्रेयसने एक चौकार ठोकला. मात्र त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. श्रेयसला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र त्याला तसं करता आलं नाही. श्रेयस 90 बॉलमध्ये 105 धावा करुन माघारी परतला.
श्रेयसची कडक सेंच्युरी
End of a fantastic knock 👏👏
Shreyas Iyer departs after scoring 105 off just 90 deliveries.
Follow the Match ▶️ https://t.co/OeTiga5wzy#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4hVNAI1JJL
— BCCI (@BCCI) September 24, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.