SL vs AFG 1St Odi Live Streming | अफगाणिस्तानमसोर श्रीलंकेचं आव्हान, जाणून घ्या सर्वकाही

Sri Lanka vs Afghanistan Odi Series | अफगाणिस्तानच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 2 जूनपासून एकदिवसीय मालिकेने होत आहे. ही एकूण 3 सामन्यांची मालिका असणार आहे. जाणून घ्या सलामीच्या सामन्याबाबत.

SL vs AFG 1St Odi Live Streming | अफगाणिस्तानमसोर श्रीलंकेचं आव्हान, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 12:15 AM

कोलंबो | आयपीएल 16 वा हंगाम पार पडल्यानंतर इंग्लंड विरुद्ध आयर्लंड कसोटी मालिकेला 1 जूनपासून सुरुवात झाली. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट वर्ल्ड कपसाठी 7 जूनपासून महाअंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू जोरदार सराव करतायेत. तर शुक्रवार 2 जूनपासून श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील वनडे सीरिज सुरु होणार आहे. या मालिकेत श्रीलंकेचं नेतृत्व हे दासून शनाका करणार आहे. तर अफगाणिस्तान टीमची धुरा हशमतुल्लाह शाहिदी याच्याकडे आहे.

वर्ल्ड कप क्वालिफायर आधी श्रीलंकेसाठी ही मालिका फार महत्वाची आहे. त्यामुळे या मालिकेत श्रीलंकेची प्रतिष्ठा ही पणाला लागणार आहे. त्यामुळे या मालिकेत श्रीलंका आपल्या घरात कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. दरम्यान या पहिल्या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामना केव्हा?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान पहिला एकदिवसीय सामना हा 2 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामन्याला सुरुवात किती वाजता होणार?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान पहिला सामन्याचं आयोजन कुठे?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना हा हंबंटोटा इथील महिंदा राजपक्षा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा टीव्हीवर सोनी नेटवर्क पाहता येईल. तसेच डिजीटल स्ट्रीमिंग श्रीलंका क्रिकेट युट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

श्रीलंका विरुद्धच्या सलामी सामन्यासाठी अफगाणिस्तान सज्ज

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका वेळापत्रक

शुक्रवार 2 जून , पहिली वनडे, सकाळी 10 वाजता.

रविवार 4 जून, दुसरी वनडे, सकाळी 10 वाजता.

बुधवार 7 जून, तिसरी वनडे, सकाळी 10 वाजता.

अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका | दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चारिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, दुशान हेमंथा, वानिंदु हसरंगा, लहिरु कुमारा दुष्मंथा चमिरा, कसून राजिथा, मथिशा पथिराना आणि महीष तीक्षणा

श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखेल, अजमतुल्लाह ओमारजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, अब्दुल रहमान, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.