SL vs NZ : श्रीलंकेचा 1 डाव आणि 154 धावांनी जबरदस्त विजय, 15 वर्षांनी पहिल्यांदाच असं घडलं

| Updated on: Sep 29, 2024 | 5:10 PM

Sri Lanka vs New Zealand 2nd Test Highlights: श्रीलंकेने न्यूझीलंडवर दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 1 डाव आणि 154 धावांनी विजय मिळवला आहे. श्रीलंकेसाठी हा ऐतिहासिक मालिका विजय ठरला आहे.

SL vs NZ : श्रीलंकेचा 1 डाव आणि 154 धावांनी जबरदस्त विजय, 15 वर्षांनी पहिल्यांदाच असं घडलं
sl vs nz test cricket
Image Credit source: PTI
Follow us on

श्रीलंकेने न्यूझीलंडचा भारत दौऱ्याआधी धुव्वा उडवला आहे. श्रीलंकेने न्यूझीलंडवर दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. श्रीलंकेने किवींवर चौथ्या दिवशी 1 डाव आणि 154 धावांनी विजय मिळवला आहे. श्रीलंकेचा कसोटी क्रिकेटमधील न्यूझीलंड विरुद्धचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. श्रीलंकेने 2 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. श्रीलंकेने यासह 2009 नंतर पहिल्यांदा मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिक जिंकण्याचा कारनामा केला आहे.

श्रीलंकेने पहिला डाव हा 5 बाद 602 धावांवर घोषित केला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांसमोर गुडघे टेकले. श्रीलंकेकडून तिघांनी शतकी खेळी केली. दिनेश चांदीमल याने 116 धावा केल्या. तर कामिंदु मेंडीस आणि कुसल मेंडीस हे दोघे नाबाद परतले. कामिंदुने 182 तर कुसलने 106 धावांचं योगदान दिलं. या तिघांच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 300 पार मजल मारली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलीप्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

जयसूर्याचा षटकार

श्रीलंकेच्या 602 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव हा अवघ्या 88 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून प्रभाथ जयसूर्या याने सर्वाधिक 6 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 514 धावांनी पिछाडीवर असल्याने फॉलोऑन खेळावं लागलं. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला दुसर्‍या डावात 360 धावांवर ऑलआऊट केलं. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्स याने दुसऱ्या डावात सर्वाधिक 78 धावा केल्या. तर प्रभाथ जयसूर्या याने 3 विकेट्स मिळवल्या. प्रभाथने यासह संपूर्ण सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या. प्रभाथला या कामगिरीसाठी ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. श्रीलंकेने यासह पहिल्या सामन्यात 63 धावांनी विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत डाव आणि 154 धावांनी विजय मिळवला.

श्रीलंकेचा दणदणीत विजय

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन) टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडीस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभाथ जयसूर्या, निशान पेरिस आणि असिथा फर्नांडो