USA vs PAK: कॅप्टन बाबर आझमने सुपर ओव्हरमधील पराभवासाठी कुणाला कारणीभूत ठरवलं?

USA vs PAK Babar Azam Post Match Presentation: बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तान क्रिकेट टीमला झिंबाब्वेनंतर यूएसएसारख्या संघांकडून पराभूत व्हावं लागलं आहे.

USA vs PAK: कॅप्टन बाबर आझमने सुपर ओव्हरमधील पराभवासाठी कुणाला कारणीभूत ठरवलं?
babar azam post match presentation usa vs pakImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 3:31 AM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 11 वा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये यजमान यूनाटडेट स्टेटसने पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी मात करत सलग दुसरा विजय नोंदवला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना यूएसएला 20 ओव्हरमध्ये 159 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर यूएसएने पाकिस्तानला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये 19 धावंचं आव्हान दिलं. मात्र सौरभ नेत्रवाळकर या मराठमोळ्या गोलंदाजासमोर पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 13 धावाच करता आल्या. यूएसचा हा कॅनडानंतरचा दुसरा विजय ठरला. यूएसएने या विजयासह ए ग्रुपमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली आहे. तसेच सुपर 8 साठी दावा ठोकला आहे.

पाकिस्तानचा हा टी 20 वर्ल्ड कप मोहिमेतील पहिलाच सामना होता. त्यामुळे पाकिस्तानची विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. यूएसएने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी बोलावलं. पाकिस्तानने कॅप्टन बाबर आझम 44, शादाब खान 40 आणि अखेरच्या क्षणी शाहिनने केलेल्या नॉट आऊट 23 रन्सच्या जोरावर पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 159 धावा केल्या. यूएसएकडून 160 धावांचा पाठलाग करताना कॅप्टन मोनांक सिंहने 50 धावा केल्या. अँड्रिज गॉसने 35 धावा जोडल्या. स्टीव्हन टेलर 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर एरोन जॉन्स आणि नितीश कुमार या दोघांनी यूएसएला सामन्यात कायम राखलं. यूएसएला शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती. एरोन जॉन्सने निर्णायक क्षणी सिक्स ठोकला. तर पाचव्या बॉलवर सिंगल घेत नितीशला स्ट्राईक दिली. शेवटच्या बॉलवर विजयासाठी 5 धावा हव्या असताना नितीशने चौकार मारुन सामना बरोबरी सोडवला. पाकिस्तान त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही अपयशी ठरली. पाकिस्तानला 19 धावांचा पाठलाग करताना 13 धावांपर्यंतच पोहचता आलं आणि 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानच्या पराभवानंतर कॅप्टन बाबर आझम काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

बाबर काय म्हणाला?

“पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरचा आम्ही पूर्ण फायदा घेऊ शकलो नाहीत. आम्ही मधल्या ओव्हर्समध्ये सातत्याने विकेट्स गमाववल्या. आम्हाला चांगल्या भागीदारीची गरज होती. पावरप्लेमध्ये आम्ही यूएसए विरुद्ध बॉलिंगनेही चांगली कामगिरी करण्याच अपयशी ठरलो. अखेरच्या क्षणी आम्ही कमबॅक केलं. पण पुढील सामन्यांमध्ये आणखी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. यूएसएला विजयाचं श्रेय जातं. ते आमच्यापेक्षा सरस होते आणि त्यामुळेच त्यांनी सामना जिंकला” असं बाबरने सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान म्हटलं.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.