मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. रॉबिन राउंड फेरीतील पहिल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. पाकिस्तानला वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात आठव्यांदा पराभूत केलं. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सावध सुरुवात केली. पण नंतर डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. पाकिस्तान 250 ते 300 धावा करेल असं वाटत असताना डाव 191 धावांवरच संपला. पाकिस्तानने 42.5 षटकात सर्व गडी बाद करत 191 धावा केल्या आणि विजयासाठी 192 धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघाने हे आव्हान 3 गडी गमवून 30.3 षटकात पूर्ण केलं.
भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे. भारताने न्यूझीलंडला मागे टाकत अव्वल स्थान गाठलं आहे. दुसरीकडे उपांत्य फेरीची वाटही सोपी केली आहे. कारण भारताला अजून दुबळ्या संघांशी सामना करायचा आहे. त्यामुळे नक्कीच फायदा होईल. भारताने 3 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह +1.821 नेट रनरेटसह अव्वल स्थान गाठलं आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
न्यूझीलंडचा संघ 3 पैकी 3 सामने जिंकत +1.604 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी, दक्षिण आफ्रिका 2 पैकी 2 सामने जिंकत +2.360 गुणांसह तिसऱ्या, पाकिस्तानने 3 पैकी 2 सामने जिंकत 4 गुणांसह -0.137 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेले चार संघांची उपांत्य फेरीत वर्णी लागणार आहे. अव्वल स्थानी असलेला संघ चौथ्या स्थानावरील संघात, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघात उपांत्य फेरीचा सामना होईल. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.
भारताने पाकिस्तानला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आठव्यांदा पराभूत केलं आहे. बाबर आझम याने यावेळी इतिहास बदलला जाईल असं सांगितलं होतं. मात्र पाकिस्तानचा आतापर्यंतचा सर्वात खराब पराभव आहे. इतक्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने पुढची वाट आणखी बिकट होणार आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.