Big News : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, गौतम गंभीरनंतर झहीर खानवर मोठी जबाबदारी, जाणून घ्या
Zaheer Khan latets News : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आलीये. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाजा झहीर खान याच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहत होता. त्यानंतर गंभीरने केकेआरमध्ये मेंटॉरची जबाबदारी पार पाडली. केकेआरने विजेतेपद जिंकल्यावर गौतम गंभीर याची टीम इंडियाच्या कोचपदी नियुक्ती झाली होती. यंदा आयपीएलचा मेगा लिलाव होणार असून त्याआधी टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान याच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या मेंटॉरपदी झहीर खान याची निवड झाली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने याबाबत सोशल मीडियावर व्हिहडीओ पोस्ट करत माहिती दिली आहे.
लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझीमध्ये गौतम गंभीर सुरूवातीचे दोन वर्षे मेंटॉर म्हणून जबाबदारी पार पाडत होता. पहिल्या दोन्ही वर्षी लखनऊ संघ आयीपएलमध्ये प्ले-ऑफसाठी पात्र ठरली होती. मात्र 2024 मध्ये गंभीरने केकेआरकडे गेला. केकेआरमध्ये गेल्यावर त्याच वर्षी केकेआरने आयपीएलचे तिसऱ्यांदा विजेतेपद उंचावले होते. लखनऊने IPL 2025 आधी मेंटॉर घेण्याचा निर्णय घेतला. आता झहीर खान लखनऊमध्ये मेंटॉर असणार आहे. झहीर खान याने आयपीएलमध्ये स्वत: 100 सामने खेळले आहेत.
He’s here, guys 💙pic.twitter.com/K7Bp7tffVB
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) August 28, 2024
लखनऊ सुपर जायंट्स संघाच कोचिंग स्टाफ पाहिला जस्टिन लँगर हे मुख्य कोच आहेत. लान्स क्लुसनर आणि ॲडम व्होजेस हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. आता या स्टाफमध्ये झहीर खान याचा समावेश होणार आहे. कोचिंग स्टाफमध्ये कोणताही बदल होणार नाही.
दरम्यान, 2011 ला टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी टीम इंडियाकडून झहीर खान याने सर्वाधिक विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. झहीर खान याने टीम इंडियासाठी 92 कसोटींमध्ये 311 विकेट, तर वनडे क्रिकेटमध्ये 200 सामन्यांमध्ये 282 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्येही झहीरने 102 विकेट मिळवल्या आहेत.आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे.