मुंबई |क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाकडून अवघ्या 3 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या क्रिकेटपटूला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. टीम इंडियाच्या या 29 वर्षीय खेळाडूला लॉटरी लागली आहे. या खेळाडूला थेट कर्णधारपद देण्यात आलं आहे. युवा नितीश राणा याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 24 जुलैपासून पॉंडेचरीत देवधर ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होत आहे. नितीश राणा या स्पर्धेत नॉर्थ झोन टीमचं कर्णधारपद सांभळणार आहे. नितीशसह अन्य युवा खेळाडूंकडे या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन टीम इंडियात स्थान मिळवण्याची दावेदारी ठोकण्याची संधी आहे.
राणा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करतो. नीतीश राणा याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 16 व्या मोसमातील साखळी फेरीतील 14 सामन्यांमध्ये 413 धावा केल्या होत्या. नीतीशने खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली. मात्र त्याला आपल्या नेतृत्वात केकेआरला प्लेऑफचं तिकीट मिळवून देण्यात यश आलं नाही. तसेच नितीश राणा टीम इंडियाकडून फक्त 3 सामने खेळला. यामध्ये 1 वनडे आणि 2 टी 20 सामन्यांचा समावेश आहे.
टीममध्ये अभिषेक शर्मा, विकेटकीपर बॅट्समन प्रभासिमरन सिंह आणि हर्षित राणा या तिघांना 15 सदस्यीय संघात स्थान मिळालंय. मात्र दुसऱ्या बाजूला या तिघांची निवड ही श्रीलंकेत होणाऱ्या एमर्जिंग एशिया कप स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
दरम्यान याआधी 2019 मध्ये देवधर ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. मात्र त्यानंतर 2020 मध्ये कोरोनामुळे आयोजन करण्यात आलं नाही. त्यानंतर आता 2023 मध्ये स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेतील सामने हे 50 ओव्हर्सचे असणार आहेत. स्पर्धेचं आयोजन हे 24 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलंय.
नॉर्थ झोन टीम | नितीश राणा (कॅप्टन), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह, एसजी रोहिल्ला, एस खजूरिया, मनदीप सिंह, हिमांशु राणा, विवरांत शर्मा, निशांत सिंधू, ऋषि धवन, युद्धवीर सिंह, संदीप शर्मा, हर्षित राणा, वैभव अरोडा आणि मयंक मार्कंडे.
राखीव खेळाडू | मयंक डागर, मयंक यादव, अर्सलान खान, शिवांक वशिष्ठ, शुभम अरोडा, युवराजसिंह, आकिब नबी आणि मनन वोहरा.