PAK vs NED : पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि प्लेइंग इलेव्हन

| Updated on: Oct 05, 2023 | 7:07 PM

ODI World Cup 2023, PAK vs NED : पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात वर्ल्डकपमधील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचं वजन असणार आहे. तर नेदरलँड पाकिस्तानचं आव्हान कसं पेलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

PAK vs NED : पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड सामन्यात हे खेळाडू ठरतील बेस्ट, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि प्लेइंग इलेव्हन
PAK vs NED : पाकिस्तान आणि नेदरलँड सामन्यात हे खेळाडू करतील मालामाल, जाणून घ्या सामन्यापूर्वी बारकावे
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील कोणत्याही सामन्यात कोणते खेळाडू आपली चमक दाखवतील, याकडे लक्ष लागून असतं. कारण जसजशी स्पर्धा पुढे जाईल, तसतशी रंगत वाढत जाणार आहे. या स्पर्धेतील दुसरा वनडे सामना पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचं वजन अधिक असणार आहे. पण नेदरलँडने सामन्याचं चित्र पालटलं तर मात्र पुढचं गणित बिघडू शकतं. पाकिस्तानने वॉर्मअप सामन्यात आपली छाप पाडली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 351 धावा रचल्या होत्या. हा सामना गमावला असला तरी फलंदाजी पाहता नेदरलँडविरुद्ध मोठी धावसंख्या उभा करू शकतो. त्यामुळे पाकिस्तानने नेदरलँडला पराभूत करताच दोन गुणांची कमाई होणार आहे. दुसरीकडे या सामन्यात काही खेळाडू आपली छाप सोडतील.

राजीव गांधी स्टेडियम पिच रिपोर्ट

राजीव गांधी स्टेडियमध्ये खेळपट्टीसाठी काळी, लाल आणि लाल-काळी अशा तीन मातींचं मिश्रण करून केली आहे. काळ्या मातीचं पिच उसळी घेतं त्यामुळे जास्त धावा होतात. लाल मातीचं पिच फिरकीपटूंना मदत करतं. त्यामुळे सामना जसा पुढे सरकतो तशी फिरकीची जादू दिसते. या मैदानावर दोन सराव सामन्यात 1500 धावा झाल्याचं पाहिलं गेलं आहे. त्यामुळे या मैदानावर 350 धावा आरामात होऊ शकतात.

कोणते खेळाडू ठरतील बेस्ट

पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात एकूण 6 सामने झाले आहेत. सहा पैकी सहा सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. या सामन्यात बाबर आझम, शादाब खान आणि शाहीन आफ्रिदीकडे लक्ष असणार आहे. हे तिन्ही खेळाडू कर्णधारासाठी योग्य निवड ठरतील.

  • लकी इलेव्हन 1 : मोहम्मद रिझवान, मॅक्स ओडोड, विक्रम सिंह, बाबर आझम (कर्णधार), इमाम उल -हक, बास डी लीडे, कॉलिन एकरॅन, लोगान वॅन बीक, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ
  • लकी इलेव्हन 2 : मोहम्मद रिझवान, स्कॉट एडवर्ड्स, बाबर आझम (उपकर्णधार), इमाम उल हक, शादाब खान, बास डी लीडे, लोगान वॅन बीक, रोलोफ वान डेर मर्व, शाहीन आफ्रिदी (कर्णधार), हारीस रउफ

दोन्ही संघांचे खेळाडू

नेदरलँड: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओडोड, बास डी लीडे, विक्रम सिंह, तेजा निदामानुरू, पॉल वॅन मीकेरेन, कॉलिन एकरॅन, रोलोफ वान डेर मर्व, लोगान वॅन बीक, आर्यन दत्त, रेयान क्लेन, वेस्ली बारेसी, साकिब जुल्फिकार , शारिज अहमद आणि साइब्राँड एंजेलब्रेक्ट

पाकिस्तान: बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमां, इमाम उल -हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस राऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.