U19 IND vs AUS Toss | महाअंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
U19 World Cup 2024 Final IND vs AUS Toss | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी कडवी झुंज होणार आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन.
बेनोनी | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे विलोमोरी पार्क बेनोनी इथे करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता टॉस करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. ऑस्ट्रेलियाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने या महाअंतिम सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. तर टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडिया-ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा फायनलमध्ये
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघ 2012 आणि 2018 मध्ये आमनेसामने आले होते. या दोन्ही वेळेस टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नावं कोरलं होतं. आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कप विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे.
टीम इंडिया यशस्वी
टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. टीम इंडियाने सर्वाधिक 5 वेळा विश्व चषक जिंकला आहे. तर टीम इंडियाची यंदाची फायनलमध्ये खेळण्याची ही नववी आणि ऑस्ट्रेलियाची पाचवी वेळ आहे.
दोन्ही संघांची जबरदस्त कामगिरी
दरम्यान या अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ हे अजिंक्य आहेत. टीम इंडियाने साखळी फेरीतील 3 सामन्यांसह, सुपर 6 मधील 2 आणि सेमी फायनल असे सलग आणि एकूण 6 सामने जिंकेल आहेत. तर सुपर 6 मधील दुसऱ्या सामन्याचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाने सर्व सामने जिंकले आहेत. सुपर 6 मधील वेस्ट इंडिद विरुद्धचा दुसऱ्या सामन्याचा निकाला लागू शकला नाही. त्यामुळे आता आणखी एक विजयासह कोणती टीम वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया टॉसचा बॉस
🚨 Toss Update 🚨
Australia have elected to bat in the #U19WorldCup Final.
Follow the match ▶️ https://t.co/RytU4cGJLu#TeamIndia | #BoysInBlue | #INDvAUS pic.twitter.com/8qSttXgLus
— BCCI (@BCCI) February 11, 2024
ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर
टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.