VHT 2024 : श्रेयस अय्यरची शतकी खेळी व्यर्थ, 382 धावा केल्यानंतरही कर्नाटकने 22 चेंडू राखून सामना जिंकला
विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात रोमांचक सामन्याची अनुभूती क्रीडारसिकांना मिळाली. मुंबई विरुद्ध कर्नाटक सामना तोडीसतोड झाला असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकने 383 धावांचं लक्ष्य गाठलं 22 चेंडू राखून पूर्ण केलं.
विजय हजारे स्पर्धेत मुंबई आणि कर्नाटक हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून कर्नाटकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. अंगकृष रघुवंशी 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर आयुष म्हात्रे आणि हार्दिक तामोरेने डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रेने 78 तर हार्दिक तामोरेने 84 धावांची खेळी केली. त्यानंतर चौथ्या स्थानावर आलेल्या श्रेयस अय्यर वादळी खेली केली. श्रेयसने फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. तसेच टीम इंडियाचं दार पुन्हा एकदा ठोठावलं आहे. 55 चेंडूत 10 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 114 धावा केल्या. त्याला शिवम दुबेची उत्तम साथ लाभली आणि 36 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने 63 धावा केल्या. पण मुंबईच्या खेळाडूंची खेळी क्रिष्णन श्रीजीतच्या खेळीपुढे फिक्या पडल्या. मुंबईने दिलेलं बलाढ्य आव्हान गाठण्यासाठी कर्नाटकने पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला आणि दिलेलं लक्ष्य 22 चेंडू राखून पूर्ण केलं. मुंबईने 4 गडी गमवून 50 षटकात 382 धावा केल्या आणि विजयासाठी 383 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान कर्नाटकने 46.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं.
कर्नाटककडून निकिन जोसने 21, मयंक अग्रवालने 47 धावा केल्या. तर अनीश केवीने 82 खेळी केली. क्रिष्णन श्रीजीतने 101 चेंडूत नाबाद 150 धावा केल्या. यात 20 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर प्रवीण दुबेने 50 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 65 धावा केल्या. मुंबईकडून एम जुनेद खानने 2 तर शिवम दुबेने 1 गडी बाद केला. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. शार्दुल ठाकुरने 6 षटकात 72 दिल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
कर्नाटक (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), अनिश केव्ही, निकिन जोस, स्मरण रविचंद्रन, अभिनव मनोहर, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), श्रेयस गोपाल, विजयकुमार विषक, प्रवीण दुबे, वासुकी कौशिक, विद्याधर पाटील.
मुंबई (प्लेइंग इलेव्हन): आंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर (कर्नाटक), सूर्यकुमार यादव, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, एम जुनेद खान, तनुष कोटियन.