मुंबई | बीसीसीआयने शुक्रवारी रात्री उशिरा आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी मेन्स आणि वूमन्स टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या मेन्स टीममध्ये एकूण 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर राखीव म्हणून 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ओपनर बॅट्समन ऋतुराज गायकवाड याच्याकडे टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची सूत्र सोपवण्यात आली आहेत. तसेच या एशियन गेम्ससाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करुन याबाबतची माहिती दिलीय.
टीममध्ये रिंकू सिंह याची पहिल्यांदाच निवड करण्यात आलीय. तसेच विदर्भाच्या पोट्ट्याचा पुन्हा एकदा भारतीय संघात समावेश करण्यात आलाय. अमरावतीकर जितेश शर्मा याला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. याआधी जितेशचा जानेवारी 2023 मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी 20 मालिकेत समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती.
त्यानंतर 2 महिन्यांनी सुरु झालेल्या आयपीएल 16 व्या मोसमात जितेशने पंजाब किंग्सकडून उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप सोडली. त्यामुळे विंडिज दौऱ्यातील टी 20 मालिकेसाठी आपली निवड होईल, अशी अपेक्षा जितेशला होती. मात्र निवड समितीने जितशेला संधी दिली नाही. त्यामुळे “माझ्या नशिबात आणखी काही मोठं असेल”, अशी प्रतिक्रिया जितेशने दिली होती. आता अखेर जितेशने म्हटलेलं खरं ठरलंय. निवड समितीने जितेशला एशियन गेम्ससाठी टीम इंडियात विकेटकीपर म्हणून संधी दिलीय.
जितेश शर्मा टीम इंडियात निवड झालेला एकूण तिसरा विदर्भाचा खेळाडू आहे. याआधी आतापर्यंत उमेश यादव आणि फैज फझल या दोघांनी टीम इंडियासाठी प्रतिनिधित्व केलंय. अमरावतीकर 29 वर्षीय जितेशने आतापर्यंत 17 फर्स्ट क्लास, 47 लिस्ट ए आणि 90 टी 20 सामने खेळले आहेत. जितेशने या सामन्यांमध्ये अनुक्रमे 632, 1350 आणि 2096 धावा केल्या आहेत. तसेच जितेशने आयपीएलमध्ये 2022 मध्ये पंजाब किंग्सकडून पदार्पण केलं होतं. जितेशने आतापर्यंत एकूण 26 आयपीएल सामन्यात 543 धावा केल्या आहेत.
जितेश शर्मा
From entertaining us in ? to now being a part of the #MenInBlue ?
Congratulations @prabhsimran01, @jiteshsharma_, and @arshdeepsinghh on being selected for the #AsianGames! ?#SaddaPunjab pic.twitter.com/6CYU03nRYX
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) July 15, 2023
जितेशची टीम इंडियात निवड होण्याची ही तिसरी वेळ ठरलीय. याआधी दोन्ही वेळेस जितेशला आंततराष्ट्रीय डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आतातरी जितेशला संधी मिळणार का, असा सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.