मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि नेदरलँड्स संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 410-4 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघ 250 धावांवर ऑल आऊट झाला. भारताने 160 धावांनी विजय मिळवत भारताच्या दिवळीच्या उत्साहाचा आनंद द्विगुणित केला. या सामन्यामध्ये आणखी एक मोठी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे भारताच्या स्टार खेळाडूंनी केलेली गोलंदाजी.
विराट कोहली याने या सामन्यात नेदरलँड्स संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याला आऊट केलं. भारतीय संघाला विकेट पडत नव्हती त्यावेळी कोहलीने चौथी विकेट घेत संघाला यश मिळवून दिलं. विराट कोहली याची ही 9 वी विकेट होती. तुम्हाला माहित आहे विराट पहिली विकेट कोणाची घेतली. जाणून घ्या. विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकही विकेट गमावली आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माजी कर्णधार कर्णधार अॅलिस्टर कुक याला आऊट केलं होतं. कोहलीने त्याला पायचीत केलं.
विरा कोहली याने विकेट घेताच स्टेडियममध्ये सगळ्याच चाहत्यांनी जल्लोष सुरू केला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणालाच विश्वास बसला नाही सुरूवातीला पण कोहलीने बॉलिंगमध्येही आपली कमाल दाखवून दिली. त्यासोबत कर्णधार रोहित शर्मानेही विकेट घेत वर्ल्ड कपमधील पहिली विकेट घेतली.
कोहलीने आऊट केलेले फलंदाज
अॅलिस्टर कुक, क्रेगक्रेग किस्वेटर, क्विंटन डेकॉक, ब्रेंडन मॅक्युलम, केविन पीटरसन, समित पटेल, मोहम्मद हाफिज, जॉन्सन चार्ल्स आणि स्कॉट एडवर्ड्स
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडाऊड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.