IND vs WI Test | Virat Kohli ‘ती’ जागा गमावणार? बदलाची सुरुवात वेस्ट इंडिजपासून, त्याच्याजागी ‘या’ खेळाडूला संधी
IND vs WI Test | टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. याच दौऱ्यापासून टीम इंडियामध्ये बदलाची प्रक्रिया सुरु होऊ शकते. विराट कोहली आता तरुण नाहीय. तो 34 वर्षांचा आहे. त्याचा फिटनेस खूपच उत्तम आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीममध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यापासून बदलाची प्रक्रिया सुरु झालेली दिसू शकते. मागच्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव केला. त्यानंतर टीममध्ये बदलाची मागणी जोर धरु लागली. टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. याच दौऱ्यापासून टीम इंडियामध्ये बदलाची प्रक्रिया सुरु होऊ शकते. यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड दोघांची टेस्ट टीममध्ये निवड झाली आहे.
टीम मॅनेजमेंटने विराट कोहलीची जागा घेणाऱ्या दुसऱ्या खेळाडूचा शोध सुरु केलाय. विराट कोहलीची जागा घेणारा सध्या तरी समर्थ पर्याय टीम इंडियाकडे नाहीय. पण विराट कोहलीच्या जागेवर मात्र दुसऱ्या पर्याय तयार होऊ शकतो.
तो विराटच्या जागी येईल
सध्या टीम इंडियाकडून सर्व फॉर्मेटमध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंगला येतात. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये शुभमन गिलच्या बॅटिंगचा नंबर बदलू शकतो. ओपनिंग ऐवजी शुभमन गिल विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या नंबरवर बॅटिंग करु शकतो. चेतेश्वर पुजारा नसल्यामुळे विराटला ती जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.
बॅकअप गरजेचा
विराट कोहली आता तरुण नाहीय. तो 34 वर्षांचा आहे. त्याचा फिटनेस खूपच उत्तम आहे. त्यामुळे पुढची 2-3 वर्ष तो आरामात खेळू शकतो. पण बॅकअप गरजेचा आहे. सिनियर प्लेयरची जागा घेण्यासाठी तरुण खेळाडूंना तशा पद्धतीने तयार करणं आवश्यक आहे. प्रयोग करण्याची चांगली संधी
सातत्यपूर्ण कामगिरीमुळे 23 वर्षाच्या शुभमन गिलने तिन्ही फॉर्मेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलय. शुभमन गिल नंबर 3 वर येणार असेल, तर ओपनिंग कोण करणार? हा प्रश्न आहे. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या दोघांमद्ये ओपनिंगच्या जागेसाठी स्पर्धा आहे. चेतेश्वर पुजारा या सीरीजमध्ये खेळत नाहीय. गिल तिसऱ्या नंबरवर येईल. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे चौथ्या-पाचव्या नंबरवर फलंदाजीला येऊ शकतात. वेस्ट इंडिज दौऱ्यात राहुल द्रविड आणि टीम मॅनेजमेंटकडे असे प्रयोग करण्याची चांगली संधी आहे.