Raj Thackeray : रमाकांत आचरेकर सरांचं पुतळ्याऐवजी स्मृती स्मारकच का? राज ठाकरे म्हणाले….

Raj Thackeray On Ramakant Achrekar Memorial : रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचे सल्लागार राज ठाकरे यांनी क्रिकेट चाहत्यांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी पुतळ्याऐवजी स्मारकच उभारण्याचं का ठरवलं? हे सांगितलं.

Raj Thackeray : रमाकांत आचरेकर सरांचं पुतळ्याऐवजी स्मृती स्मारकच का? राज ठाकरे म्हणाले....
Raj Thackeray On Ramakant Achrekar Memorial
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 8:43 PM

सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे या आणि यासारख्या एकसेएक आणि तोडीसतोड क्रिकेटपटू घडवणारे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या जंयतीनिमित्ताने आज 3 डिसेंबर रोजी त्यांच्या स्मृती स्मारकाचं अनावरण करण्यात आलं. दादर येथील शिवाजी महाराज पार्क मैदानातील गेट क्रमांक 5 येथे हे स्मृती स्मारक उभारण्यात आलं आहे. दिग्गज क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्मारकाचे सल्लागार मनसेप्रमुख यांनी या स्मारकाचं अनावरण केलं. यावेळेस माजी क्रिकेटपटू आणि सरांचे शिष्य प्रवीण आमरे, विनोद कांबळी आणि क्रिकेट चाहते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी स्मारकाचं अनावरण केल्यांनतर उपस्थितांना संबोधित केलं. राज ठाकरे यांनी यावेळेस आचरेकर सरांचा पुतळा उभारण्याऐवजी स्मृती स्मारकच का उभारलं? या मागचं कारण सांगितलं.

राज ठाकरे काय म्हणाले?

“मला इथे आचरेकर सर यांचा पुतळा नको होता. आपल्याकडे पुतळे खूप झाले आहेत. त्यामुळे वेगळं काही करायंच ठरवलं, ज्यातून आचरेकर सरांची खरी ओळख मुलांना समजेल. त्यामुळे स्टंप्स, पॅड्स, ग्लोव्हज, बॉल, हेल्मेट आणि त्या बॅटवर आचरेकर सरांची टोपी,अशा स्वरुपाचं सर्वसमावेशक स्मृती स्मारक करण्याचं ठरवलं. कॅप ही आचरेकर सरांची ओळख होती”, असं राज ठाकरे म्हणाले.

खेळाडूंना सल्ला

आज या सगळ्या बदललेल्या क्रिकेटमध्ये आचरेकर सरांचं नाव मोठं होताना दिसतंय, लोकांपर्यंत जातंय. सर्व खेळाडू हे सरांपुढे नतमस्तक होतायत, ही गोष्ट प्रेरणादायी आहे. इतर सर्व खेळाडूंनी यातून काही गोष्ट घेतली पाहिजे आणि शिकलं पाहिजे, असं मला वाटतं”, असं राज ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंचा यंत्रणेवर हल्लाबोल

सुनील रमणी यांचं हे स्मारक उभारण्यात मोठं योगदान आहे. त्यांनी मनापासून सर्व गोष्टी केल्या त्यामुळे स्मारक उभं राहिले. सुनील रमणी दिवसरात्र माझ्या मागे असायचे. आपल्याकडे परवानगी मिळवणं फार अवघड असतं. सर्वच गोष्टी कठीण असतात. महानगरपालिका, राज्य सरकार, परवानगी मिळवणं कठीण असतं. आपल्याकडे अनधिकृत करायला गेलं की त्याला परवानगी लागत नाही. मात्र अधिकृतरित्या करायला गेलं की परवानगी लागते. त्यामुळे स्मारकासाठी अनेक परवानग्या घेण्यात बराच वेळ गेला. स्मारक फार आधी व्हायला पाहिजे होतं”, असं म्हणत राज ठाकरे यांनी यंत्रणेवर हल्लाबोल केला आणि स्मारकाला विलंब झाल्याची खंत बोलून दाखवली.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.