रोसेऊ : टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी तयार आहे. बुधवारपासून डॉमिनिका येथे दोन टेस्ट मॅचची सीरीज सुरु होणार आहे. पहिला सामना रोसेऊच्या विंडसर पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावर 6 वर्षानंतर पहिला कसोटी सामना होणार आहे. 2011 साली या मैदानावर भारत-वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. हा सामना ड्रॉ झाला होता. त्यानंतर झालेल्या सर्व सामन्यांचा निकाल लागला.
या टेस्टपासून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलला सुरुवात करणर आहे. टीम इंडियाच्या कामगिरीकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.
कसा आहे विंडसर पार्कचा पीच?
विंडसर पार्कच्या खेळपट्टीवर स्पिन गोलंदाजांना मदत मिळू शकते. वेस्ट इंडिजचा ऑफ स्पिनर शेन शिलिंगफोर्डच्या नावावर 2 टेस्ट मॅचमध्ये 20 विकेट आहेत. इथे सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर देवेंद्र बिशू आणि तिसऱ्या नंबरवर नाथन लायन आहे. या खेळपट्टीकडून स्पिनर्सना मदत मिळेल हे निश्चित आहे. असं झाल्यास अश्विन, जाडेजा आणि अक्षर या तिघांच्या तिकडीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. या विकेटवर अजूनपर्यंत टेस्टमध्ये कधीही 400 धावांचा स्कोर झालेला नाही. त्यामुळे इथे मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता कमी आहे.
कसं असेल हवामान?
डॉमिनिकाच्या चारही बाजूला समुद्र आहे. त्यामुळेच इथे चांगला पाऊस पडतो. मॅचचे पाचही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटच्या दिवशी जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मॅचचे पाचही दिवस तापमान 27 ते 30 डिग्री दरम्यान रहाण्याची शक्यता आहे. टेस्ट मॅचच्या दृष्टीने हे एक चांगल तापमान मानलं जातं. मधल्यामध्ये पावसाच्या सरी खेळ बिघडवू शकतात.
Captain of the @BCCI Test team, Rohit Sharma & WI Captain, Kraigg Brathwaite take a moment with the Minister for Culture, Youth, Sports & Community Development, Hon. Gretta Roberts in Dominica. #WIvIND #WIHome pic.twitter.com/CfWA2RlR5M
— Windies Cricket (@windiescricket) July 11, 2023
टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी विंडिज क्रिकेट संघ
क्रॅग ब्रेथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टेगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.