Video : आर. अश्विन याने पहिल्या कसोटीपूर्वी नेमकं काय केलं? गोलंदाजी व्यवस्थित व्हावी यासाठी असं काही केलं
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचं पारडं जड असल्याचं दिसून आलं आहे. आर. अश्विनच्या फिरकीपुढे निम्मा संघ तंबूत परतला. मात्र या सामन्यापूर्वी आर. अश्विन याने काय केलं होतं माहिती आहे का?
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर भारताने पहिल्या दिवसापासून पकड मिळवली आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या संपूर्ण संघ 150 धावांवर तंबूत पाठवला. यात फिरकीपटू आर. अश्विन याने महत्त्वाची भूमिका बजावली. आर. अश्विन याने 24.3 षटकं टाकत 60 धावा दिल्या 5 गडी बाद केले. तसेच सहा षटकं निर्धाव टाकली. या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण वेस्ट इंडिजच्या धरतीवर जम बसवणं वाटतं तितकं सोपं नव्हतं असं खुद्द आर. अश्विन यानेच सांगितलं आहे. प्रवास आणि झोपण्याच्या वेळा यामुळे सर्वच गणित बिघडलं होतं. मात्र यावर मात्र करण्यासाठी काय क्लुप्ती वापरली त्याबाबत आर. अश्विन याने सांगितलं आहे.
काय म्हणाला आर. अश्विन?
“नेटमध्ये सराव करताना मला वेगळंच वाटत होतं. जेट लॅगचा मला त्रास होत होता. दुसऱ्या सराव शिबिरातही फार काही बदल झालेला दिलना नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजमधील परिस्थितीशी जुळवून घेताना त्रास होत होता. त्यामुळे यावर मात करणं गरजेचं होतं. म्हणून सिमेंट विकेटवर सराव करण्यास सुरुवात केली.” असं आर. अश्विन याने सांगितलं.
How does one overcome jet lag, adapts to the bowling conditions and executes it to perfection?
Bowling on cement surfaces, says @ashwinravi99 ?
WATCH ?? #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/5iYQS7XlyR
— BCCI (@BCCI) July 13, 2023
“जेट लॅग ही समस्या लांबचा प्रवास केल्याने जाणवते. त्याचबरोबर माझ्या गोलंदाजीच्या वेगावर परिणाम दिसून येत होता. माझी बॉडी बॉलसोबत झुकत होती. नक्की काय होत आहे हे समजून घेण्यासीठी काही वेळ गेला. खासकरून स्लो आणि टर्निंग खेळपट्टीवर सराव करताना असं दिसून येतं. त्यामुळे आता सराव कसा करायचा हा प्रश्न होता. त्यामुळे सिमेंट विकेटवर सराव करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॉल टाकताना कमी जोर लागत होता. तसेच चेंडू योग्य ठिकाणी टाकण्यास मदत झाली.”, असं आर. अश्विन याने पुढे सांगितलं.
आर. अश्विनची कसोटी कारकिर्द
आर. अश्विन आतापर्यंत 92 कसोटी सामने खेळला असून 93 वा कसोटी सामना सुरु आहे. आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत आर. अश्विन याने कसोटीत 474 गडी बाद केले आहेत. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉर्मेटमध्ये 700 गड्यांचा टप्पा ओलांडला आहे. आर. अश्विन याने 93 व्या कसोटी सामन्यात 33 वेळा एका डावात पाच गडी बाद केले आहेत. यासह कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला मागे टाकले आहे.