डोमिनिका | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला 12 जुलैपासून सुरुवात झाली. या कसोटीतील पहिला दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिला. टीम इंडियाने टॉस गमावल्यानंतर विंडिजला पहिल्या डावात 150 धावांवर गुंडाळलं. विंडिजकडून एलिक एथानझे याने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून आर अश्विन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. अश्विनची कसोटीत 5 विकेट्स घेण्याची ही 33 वी वेळ ठरली. तसेच अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 विकेट्सचा टप्पा पार केला.
विंडिजला ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडिया बॅटिंगसाठी आली. कॅप्टन रोहित शर्मा आणि डेब्यूटंट यशस्वी जयस्वाल ही जोडी सलामीला आली. या जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 23 ओव्हर्समध्ये बिनबाद 80 धावा केल्या. यशस्वी 40 आणि रोहित 30 धावांवर नाबाद आहे. तर टीम इंडिया अजून 70 धावांची पिछाडीवर आहे.
It was Gavaskar & Shastri at Karachi in 1983
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) July 12, 2023
रोहित आणि यशस्वी या जोडीने मैदानात पाय ठेवताच मोठा विक्रम झाला. रोहित आणि यशस्वी टीम इंडियासाठी 40 वर्षानंतर ओपनिंग करणारी दुसरी मुंबईकर जोडी ठरली. याआधी 1983 मध्ये इंग्लंड विरुद्ध सुरु नायक आणि रवी शास्त्री या मुंबईकर जोडीने टीम इंडियासाठी ओपनिंग केली होती.
दरम्यान यशस्वी याने विंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. यशस्वीसोबत इशान किशन यानेही टेस्ट डेब्यू केलं. यशस्वी याची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी मुख्य संघात निवड करण्यात आली होती. मात्र केएस भरत याला संधी दिल्याने ईशानचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. तर दुसऱ्या बाजूला यशस्वी जयस्वाल याला ऋतुराज गायकवाड याच्या जागी डब्ल्यूटीसी फायनल 2023 साठी राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. मात्र अवघ्या एका महिन्यानंतर दोघांना टेस्ट डेब्यूची संधी मिळालीच.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.