IND vs WI | विडिंज विरुद्ध पहिली ODI, प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन खेळाडूंमध्ये जोरदार चुरस
IND vs WI | आता सर्वकाही रोहित शर्माच्या निर्णयावर अवलंबून आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीजपासून टीम इंडिया आपल्या वनडे वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहे.
नवी दिल्ली : टेस्ट सीरीज संपल्यानंतर आता वनडे सीरीजची प्रतिक्षा आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध 3 वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. वनडे सीरीजसाठी टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये चुरस आहे. टीम इंडियाने टेस्ट सीरीज 1-0 ने जिंकली. आता वनडे सीरीजमध्येही तशाच निकालाची अपेक्षा आहे. वेस्ट इंडिजचा संघ तुलनेने कमकुवत आहे. त्यामुळे टीम इंडियाला सीरीज जिंकण्यात फार अडचणी येतील, असं वाटत नाही.
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी संजू सॅमसन आणि इशान किशन या दोन खेळाडूंमध्ये मुख्य स्पर्धा असेल. दोघेही विकेटकीपर फलंदाज आहेत. दोघांपैकी कोणाला संधी द्यायची? याचा निर्णय कॅप्टन रोहित शर्माला घ्यावा लागेल.
संधीच सोन केलं
संजू सॅमसनला वनडे सीरीजसाठी टीममध्ये निवडण्यात आलं आहे. इशान किशन टेस्ट सीरीजपासूनच टीमसोबत आहे. वेस्ट इंडिजमध्ये इशानला टेस्ट डेब्युची सुद्धा संधी मिळाली. कॅरेबियाई टीमविरोधात इशान किशनने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला. त्याने एकप्रकारे वनडे टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी दावेदारी सुद्धा सांगितली.
दोघांच्या रेकॉर्डवर नजर
रोहित शर्मा काय विचार करतो? वनडे सीरीजसाठी टीमची गरज काय आहे? इशान किशनलाच रोहित प्राधान्य देईल का? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याआधी एकदा दोघांच्या रेकॉर्डवर नजर मारा.
वनडेमध्ये अजून शतक नाही
संजू सॅमसनने आतापर्यंत 11 वनडे सामन्यात 66 च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 104.76 होता. त्याचा बेस्ट स्कोर 86 आहे. म्हणजे वनडेमध्ये संजूने अजून शतकी खेळी केलेली नाही.
42.50 च्या सरासरीने 510 धावा
इशान किशन डावखुरा फलंदाज आहे. तो भारतासाठी आतापर्यंत 14 वनडे सामने खेळलाय. त्याने 42.50 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 106.02 आहे. 210 त्याचा बेस्ट स्कोर आहे.
5 नंबरची जागा कोणाला?
दोघांकडे ओपनिंगपासून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे. टीमच्या सध्याच्या बॅटिंग लाइनअपमध्ये नंबर 5 ची जागा या दोघांपैकी एकाला मिळू शकते. हीच पोजिशन असेल, तर संजू इशानपेक्षा या जागेवर अधिक फिट बसतो. वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीजपासून टीम इंडिया आपल्या वनडे वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहे. वनडे टीममध्ये संजू सॅमसनची निवड झालीय. यामागे टीम मॅनेजमेंटचा नक्कीच काहीतरी विचार असणार. अंतिम निर्णय कॅप्टन म्हणून रोहित शर्माला करायचा आहे.