वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील अ गटातील साखळी फेरीतीली शेवटचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. हा सामना तिन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकला तर थेट पात्र होईल. पण पाकिस्तानने जिंकला तर मात्र उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित होतील. आता पहिल्या डावात तसंच काहीसं झालं आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला 110 धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवलं आहे. पाकिस्तानसमोर विजयासाठी फक्त 111 धावांचं आव्हान आहे. आता हे आव्हान पाकिस्तान गाठलं की भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल. कारण न्यूझीलंडच्या तुलनेत भारताचा नेट रनरेट हा चांगला आहे. पण पाकिस्तानने सर्वात आधी 111 धावांचं टार्गेट गाठणं गरजेचं आहे. पाकिस्तानने हे आव्हान 14 षटकांच्या पुढे कसंही गाठलं तरी भारताला उपांत्य फेरीचा मार्ग सापडेल. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने चमत्कारीक गोलंदाजी केली असंच म्हणावं लागेल. आता फलंदाजांना त्यांची जबाबदारी पार पाडायची आहे.
पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांना 40 धावांच्या आत रोखण्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना यश आलं. जॉर्जिय प्लिमर बाद झाली आणि धावगती एकदम खाली आल्यासारखी झाली. सुझी बेट्सही 28 धावा करून तंबूत परतली. न्यूझीलंडकडून मोठी धावसंख्या उभारण्यात कोणत्याही खेळाडूला यश आलं नाही. टप्प्याटप्प्याने विकेट पडत गेल्या. तसं पाहिलं तर वुमन्स क्रिकेटमध्ये 111 ही धावसंख्याही मोठी आहे. पण शेवटच्या सामन्यात पाकिस्तान संघ निडरपणे खेळला तर विजय सहज शक्य आहे. पाकिस्तानकडून नाशरा संधूने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर सादिया इकबाल, निदा दार आणि ओमैमा सोहेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, सदफ शमास, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास