मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना केवळ औपचारिकता असणार आहे. कारण या दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या दृष्टीने इंग्लंडला या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. टॉप 8 मध्ये राहण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकावाच लागेल. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार यात शंका नाही. वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 91 वेळा आमनेसामने आले आहेत. यात इंग्लंडने 56, तर पाकिस्तानने 32 सामन्यात विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 10 वेळा भिडले आहेत. यात पाकिस्तानने 5, तर इंग्लंडने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना कोलकात्याच्या मैदानावर रंगणार आहे. हे मैदान फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी चांगलं आहे. त्यामुळे उत्कृष्ठ कामगिरी करणारा संघच बाजी मारेल. या मैदानावर आतापर्यंत 38 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात 22 वेळा पहिली फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 242 धावा करू शकतो. इडन गार्डन मैदानात स्वच्छ वातावरण असेल. त्यामुळे पावसाची कोणतीच शक्यता नाही. आर्द्रता 46 टक्क्यांपर्यंत असेल. तापमान 21 ते 32 डिग्रीच्या मधे असेल.
इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेविड विली, एटकिंसन, आदिल राशिद.
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम, हारिस रऊफ.