आशिया चषकामध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानची टीम (Pakistan Team) सध्या अधिक फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार आझम बाबर सुद्धा अधिक चर्चेत आला आहे. सुपर चार मधील महत्त्वाच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर त्याचं पाकिस्तान फॅनकडून अधिक कौतुक झालं आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. त्यापैकी काल एक त्यांच्यात एक मॅच झाली त्यामध्ये पाकिस्तान टीम पराभूत झाली आहे. त्यामुळे पुन्हा पाकिस्तानचे खेळाडू (Player) चर्चेत आले आहेत. कालच्या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Babar Azam was Saying ” Main Captain Hon ” ??♥️♥️♥️♥️
हे सुद्धा वाचाBest Best Part Today match ♥️♥️♥️ @babarazam258 #PAKvsSL pic.twitter.com/loKKT2BOfu
— wajeeha ? Rumesa, Zainu, Hunaiza Bday ? (@Maheen_Wajeeha) September 9, 2022
काल झालेल्या श्रीलंका विरुद्ध सामन्या पाकिस्तान संघाचा पराभव हा झाला. हा पराभव खूप मोठ्या फरकाने झाला आहे. श्रीलंका संघाने पाच गडी राखून हा विजय मिळविला असल्याने त्याचे अंतिम सामन्यासाठी धाबे दणाणले असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
पाकिस्तानी विकेटकीपर रिझवानने सामना सुरु असताना डीआरएस मागितला, त्यावेळी हा निर्णय टीमच्या कर्णधाराने मागिल्यावरचं द्यायचा असतो असा नियम आहे. सामन्याच्या पंचानी त्या खेळाडूचा विनंती मान्य करुन डीआरएस घेतला. त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने मी कर्णधार आहे असं वक्तव्य केलं होतं.
बाबर आझम याने केलेलं वक्तव्य तितल्या माईकमध्ये जशास तसं रेकॉर्ड झालं, ते सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला अधिक ट्रोल केलं जात आहे.