मोहम्मद शमी सध्या टीम इंडियाच्या बाहेर आहे. 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मोहम्मद शमी शेवटचा टीम इंडियाकडून खेळला होता. दुखापतीमुळेच शमीला IPL 2024 मध्ये खेळला आलं नव्हतं. शमी गुजरात टायटन्सचा भाग होता. आता 2025 मेगा ऑक्शनसाठी तो मैदानात असेल. मोहम्मद शमी सध्या टीम इंडियाचे माजी खेळाडू संजय मांजरेकरांवर वाईट पद्धतीने भडकला आहे. हा सगळा विषय काय आहे? ते समजून घेऊया.
संजय मांजरेकरांनी एक वक्तव्य केलं. शमीला ऑक्शनमध्ये मनासारखी किंमत मिळणार नाही. शमीची इंजरी लक्षात घेऊन संजय मांजरेकरांनी हे विधान केलं होतं. त्यावर मोहम्मद शमीने टिप्पणी केली. ‘भविष्य जाणून घेण्यासाठी लोकांनी संजय सरांना भेटावं’. शमीने त्याच्या इन्स्टाग्राममधून एक स्टोरी शेअर केली. स्टोरीमध्ये संजय मांजेरकरांची भविष्यवाणी होती. शमीबद्दल मांजरेकर जे बोलले, ते स्टोरीमध्ये होतं. शमीने खाली लिहिलेलं की, “बाबांचा जय. थोडसं ज्ञान आपल्या फ्यूचरसाठी पण ठेवा, उपयोगात येईल, संजय जी. कोणाला आपलं भविष्य जाणून घ्यायचं असेल, तर संजय सरांना भेटा”
त्या सीजनमध्ये सर्वाधिक विकेट काढल्या
गुजरात टायटन्सने 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये मोहम्मद शमीला विकत घेतलं होतं. शमीने 16 सामन्यात 20 विकेट घेतले. त्यानंतर पुढच्या 2023 च्या सीजनमध्ये शमीने 17 सामन्यात 28 विकेट काढले. त्या सीजनमध्ये शमी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला होता. पण त्यानंतर पुढच्या 2024 च्या सीजनमध्ये शमी दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आता फ्रेंचायजीने मेगा ऑक्शनआधी शमीला रिलीज केलय.
IPL मध्ये आतापर्यंत किती विकेट काढलेत?
आयपीएलमध्ये मोहम्मद शमी आतापर्यंत 110 सामने खेळला आहे. या 110 सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 28.86 च्या सरासरीने 127 विकेट काढले आहेत.