फालतू मेसेज करणाऱ्यांचे व्हॉटसअप अकाऊंट बंद होणार
जगातील सर्वात मोठी इन्स्टेन्ट मेसेजिंग सर्व्हिस देणारी कंपनी व्हॉटसअॅपने नवीन फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे यूजर्सचा बल्क मेसेजपासून सूटका मिळणार आहे.
मुंबई : जगातील सर्वात मोठी इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस देणारी कंपनी व्हॉटसअपने नवीन फीचर लाँच केलं आहे. या फीचरमुळे युजर्सची बल्क मेसेजपासून सुटका होणार आहे. जे तुम्हाला दररोज बल्क मेसेज पाठवतात अशा युजर्सचे अकाऊंट व्हॉटसअप आता बंद करणार आहे. यासोबतच कंपनी अशा लोकांच्या विरोधात कायद्याने कारवाईही करु शकते.
व्हॉटसअपने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, आम्ही अशा लोकांचे अकाऊंट बंद करणार जे बल्क मेसेज इतरांना पाठवतात. या फीचरची सुरुवात 7 डिसेंबर 2019 पासून होणार आहे. व्हॉटसअपवर 90 टक्के खासगी मेसेज असतात, पण गेल्या काही दिवसांपासून बल्क मेसेजचा ट्रेंड सुरु झाला आहे.
बल्क मेसेज सर्वाधिक राजकीय पक्ष आणि डिजीटल मार्केटिंग करणाऱ्याकडून पाठवण्यात येत आहेत. तसेच यामाध्यमातून अनेकजण फेक न्यूजही शेअर करतात. यामुळे व्हॉटसअपचे हे पाऊल फेक न्यूज आणि बल्क मेसेजवर आळा आणण्यासाठी मदत करेल.
व्हॉटसअपने म्हटलं की, जर कोणत्या अकाऊंटवरुन 15 सेकंदात 100 मेसेज पाठवले जातात, तर त्या अकाऊंटला बल्क मेसेज म्हणून दोषी ठरवले जाणार आणि त्याचे अकाऊंट बद केले जाईल. तसेच अकाऊंट बनवल्यावर पाच मिनिटानंतर अनेक जणांना मेसेज पाठवल्यास कंपनी त्यांच्या विरोधात कारवाई करणार.
याशिवाय ज्या अकाऊंटवरुन अनेक ग्रुप तयार केले जातात. उदा., जर तुमही कोणतेही व्हॉटसअप अकाऊंट तयार करता आणि तातडीने अनेक ग्रुप तयार करुन अनेक जण जोडले जातात, अशा अकाऊंटना कंपनी बंद करणार आहे.
संबधित बातम्या :