OnePlus 13 स्मार्टफोन ‘या’ तारखेला होणार लाँच; काय आहेत फीचर्स, किंमत? वाचा
वनप्लस १३ स्मार्टफोन लाँचिंग तारीख जवळ आली आहे. हा स्मार्टफोन प्रेमींना नवीन आणि आकर्षक वैशिष्ट्यांसह एक उत्तम अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रीमियम सेगमेंटमध्ये हा फोन नवी ओळख निर्माण करू शकतो.
वनप्लसने नुकताच त्यांचा नवीन फ्लॅगशिप फोन वनप्लस 13 लाँच करण्याची घोषणा केली आहे. OnePlus 13 भारतीय बाजारात लवकरच येणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु असल्याने स्मार्टफोन प्रेमींना अधिकच उत्सुकता लागली होती. आता मात्र स्मार्टफोन चाहत्यांना OnePlus १३ हा फोन लवकरच पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहे.
OnePlus कंपनीने त्याचा हा नवीन स्मार्टफोन जानेवारी २०२५ मध्ये भारत आणि इतर देशांमध्ये लाँच करण्याची घोषणा यावेळी केली आहे. त्यामुळे आता स्मार्टफोन प्रेमींना हा फोन नवीन वर्षात खरेदी करता येणार आहे. वनप्लस 13 खास अशा युजर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे जे प्रीमियम स्मार्टफोनच्या शोधात आहेत. हा फोन मिडनाइट ओशन, ब्लॅक आणि आर्क्टिक डॉन या तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. हा फोन सॅमसंग गॅलेक्सी एस २५ सारख्या प्रीमियम सीरिजला टक्कर देऊ शकतो, त्यामुळे OnePlus 13 हा स्मार्टफोन मार्केटमध्ये नवी खळबळ माजवू शकतो.
नवीन डिझाइन आणि डिस्प्ले
वनप्लस 13 हा स्मार्टफोन पूर्णपणे नवीन असू शकतो. यात फ्लॅट फ्रेम आहे, ज्यामुळे ते अधिक प्रीमियम आणि आकर्षक दिसू शकतो. या फोनचा एक्स २ ओएलईडी डिस्प्ले उत्तम रंग आणि ब्राइटनेस देऊ शकतो. तर हा स्मार्टफोनचा डिस्प्ले ॲडेप्टिव्ह रिफ्रेश रेटसह येतो, जो व्हिडिओ, गेम्स आणि इतर ॲप्समध्ये सहज अनुभव देऊ शकतो. कॅमेरा मॉड्यूलला नवीन डिझाइन देण्यात आली आहे, ज्यामध्ये हॅसेलब्लाडचा लोगो देखील आहे, ज्यामुळे कॅमेऱ्याची गुणवत्ता आणखी सुधारू शकते.
दमदार परफॉर्मन्स आणि कॅमेरा
OnePlus 13 मध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला जाऊ शकतो, ज्यामुळे फोन सुपरफास्ट आणि स्मूथ पद्धतीने हाताळता येऊ शकतो. यात 24 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेजचा पर्याय देखील असू शकतो, जेणेकरून वापरकर्त्यांना कोणतेही ॲप किंवा गेम चालविण्यात कोणतीही अडचण येणार नाही. याच्या कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे असू शकतात. तर पहिला कॅमेरा OIS (ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन) सह आहे, दुसरा 3 एक्स पेरिस्कोप लेन्स आणि तिसरा अल्ट्रावाइड कॅमेरा असू शकतो. त्यात या फोनची बॅटरी 6000mAh ची आहे, जी 100W वायर्ड आणि 50W वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करू शकते.
OnePlus 13 फोनची संभाव्य किंमत
भारतात OnePlus 13 ची सुरुवातीची किंमत 65,000 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. प्रीमियम सेगमेंटमध्ये हा फोन आयफोन आणि सॅमसंगला टक्कर देऊ शकतो, अशी अपेक्षा कंपनीने वर्तवली आहे.