Samsung Galaxy S8 वर तब्बल 19,000 रुपयांचा डिस्काऊंट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्राहकांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. 20 जानेवारी 2019 रोजीपासून फ्लिपकार्ट Republic Day Sale सुरु करत आहे. यामध्ये कमी किंमतीत जास्तीत जास्त शॉपिंग करता येणार आहे. फ्लिपकार्ट या सेलमध्ये आपल्या अनेक वस्तूंवर मोठ्या संख्येने सूट देत आहे. 20 जानेवारी ते 22 जानेवारी 2019 पर्यंत हा सेल सुरु […]

Samsung Galaxy S8 वर तब्बल 19,000 रुपयांचा डिस्काऊंट
Follow us on

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्राहकांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. 20 जानेवारी 2019 रोजीपासून फ्लिपकार्ट Republic Day Sale सुरु करत आहे. यामध्ये कमी किंमतीत जास्तीत जास्त शॉपिंग करता येणार आहे. फ्लिपकार्ट या सेलमध्ये आपल्या अनेक वस्तूंवर मोठ्या संख्येने सूट देत आहे. 20 जानेवारी ते 22 जानेवारी 2019 पर्यंत हा सेल सुरु असेल. सेल दरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही मोठी सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्टने या सेलसाठी स्टेट बँक इंडियासोबत भागिदारी केली आहे. ज्यामध्ये तुम्ही खरेदी करण्यासाठी जर एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केला तर ग्राहकांना दहा टक्के सूट मिळणार आहे. तसेच एसबीआयच्या डेबिट कार्डवर ईएमआय आणि क्रेडिट कार्डच्या खरेदीवर नो कॉस्ट ईमआय ऑफरही मिळणार आहे.

स्मार्टफोनसवर मिळणार भरघोस सूट

जर आपण स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कंपनीने आपल्या या सेलमध्ये अनेक वस्तूंवर मोठी सूट दिली आहे. मात्र हा सेल स्मार्टफोन ग्राहकांसाठी जास्त फायदेशीर राहणार आहे. Xiaomi, Realme, Samsung, Asus, OnePlus, Motorola कंपनीच्या स्मार्टफोनवरही तुम्हाला डिस्काऊंट मिळणार आहे. चला तर मग पाहूया रिपब्लिक डे सेलमध्ये कोणत्या कोणत्या स्मार्टफोन्सवर ऑफर आहेत.

Asus Smartphone

या सेलमध्ये Asus ब्रँडच्या अनेक स्मार्टफोनवर ग्राहकांना सूट मिळणार आहे. कंपनीकडून या सेलमध्ये Asus ZenFone 5Z, ZenFone Max M2, ZenFone Lite L1 फोनवर सूट दिली जाणार आहे. असूस झेनफोन 5जी तुम्ही सेलमध्ये 24,999 रुपयात खरेदी करु शकता. या फोनची बाजारात किंमत 32,999 रुपये आहे. एसबीआय कार्डच्या खरेदीवर तुम्हाला दहा टक्क्यांची सूट मिळणार आहे. तसेच ZenFone Max M2 फोनवर एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे. हा फोन तुम्ही 8,999 रुपयात खरेदी करु शकता. याचा दुसरा व्हेरिऐंट 4 जीबी रॅम मॉडल 11,999 रुपयांत खरेदी करु शकता.

Asus ZenFone Max Pro M19 स्मार्टफोन तुम्ही 9,999 रुपयांत आणि दुसरा व्हेरिऐंट 64 जीबी मेमरीवाला फोन 12,999 रुपयात मिळणार आहे. ZenFoneLite L1 वर एक हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच डिस्काऊंटनंतर हा स्मार्टफोन तुम्ही 4,999 रुपयात खरेददी करु शकता.

Honor

Flipkart Republic Day Sale मध्ये ग्राहकांना Honor चे अनेक स्मार्टफोन कमी दरात मिळणार आहेत. सेलमध्ये Honor 9 ग्राहकांना 6,349 रुपयांच्या डिस्काऊंटसोबत मिळणार आहे. 3जीबी रॅमवाला स्मार्टफोन 13,999 रुपयांत खरेदी करु शकता. तर 4 जीबी मॉडेल 15,999 रुपयांत खरेदी करु शकता. Honor 7A वर 500 रुपयांच्या सूटनंतर हा फोन सेलमध्ये 7,499 रुपयात मिळणार आहे. तर हा फोन सुरुवातीला 8,999 रुपयांत बाजारात लाँच केला होता. Honor 9 Lite 3 जीबी रॅमसोबत 32 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम/64 जीबीवाल फोन व्हेरिऐंट डिस्काऊंटनंतर अनुक्रमे 8,499 रुपये आणि 10,999 रुपयात मिळणार आहे.

Samsung

Samsung Galaxy S8 वर तब्बल 19 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. 49,990 रुपयांच्या स्मार्टफोनला तुम्ही फक्त 30,990 रुपयांच्या किंमतीत खरेदी करु शकता. Samsung Galaxy On6 वर 5,500 रुपयांची सूट दिली जाणार आहे. त्यानंतर हा फोन 9,990 रुपयात खरेदी करु शकता.

Nokia आणि Moto

फ्लिपकार्टच्या रिपब्लिक सेलमध्ये नोकियाच्या Nokia6.1 प्लस 14,999 मिळणार आहे. कंपनीने हा फोन भारतीय बाजारपेठेत 15,999 रुपयात लाँच केला होता. तसेच मोटरोलाचा मोटो वन पॉवर ग्राहकांना 13,999 रुपयात मिळणार आहे.

Realme 2 Pro, Realme C1 आणि Realme U1

Realme ने सुद्धा Realpublic day Sale ची घोषणा केली आहे. कंपनी भविष्यात फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आपल्या ग्राहकांना रिअलमीच्या फोन्सवर अनेक ऑफर देणार आहे. ग्राहकांना या ऑफर्सचा लाभ ईकॉमर्स वेबसाईट Flipkart वर घेता येणार आहे. कंपनीच्या रिअलमी 2 प्रो स्मार्टफोन सेलच्या दरम्यान एक हजार डिस्काऊंटसोबत विकला जात आहे. तसेच हा स्मार्टफोन बाजारात 13,999 रुपयात ग्राहकांना मिळणार आहे. या फोनचा 8 जीबी रॅमवाला स्मार्टफोन 17,990 रुपयात मिळणार आहे. तसेच कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन रिअलमी यू1वर सुद्धा एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे. रिअलमी 1 चा व्हेरिऐंट 11,999 रुपयात मिळणार आहे. या वर्षात रिअलमी सी 1500 रुपयासोबत खरेदी करु शकता. हे सर्व स्मार्टफोन SBI क्रेडिट कार्डने खरेदी केले तर 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे.

OPPO आणि POCO

OPPO F9 कंपनीने 2018 च्या ऑगस्ट महिन्यात हा फोन लाँच केला होता. भारतीय बाजारात या फोनची किंमत सुरुवातीला 16,990 रुपये आहे. फ्लिपकार्ट रिपब्लिक सेलमध्ये हा फोन ग्राहकांना 12,990 मध्ये मिळणार आहे. पोक्को एफ1 स्मार्टफोन चा 128 जीबीवाला व्हिरिऐंट या सेलमध्ये 20,999 रुपयांत मिळणार आहे.