VIDEO | काळी पॅन्ट घातलेल्या माकडाने कुत्र्याला लोळवलं, पाहा व्हायरल व्हिडीओ
Trending Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक माकड कुत्र्यांशी पंगा घेत आहे. माकडाने कुत्र्याची काय अवस्था केली आहे, हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र : काही प्राणी (animal video) अधिक भयानक असतात, एखाद्या माणसाला पाहिल्यानंतर ते त्यांच्या अंगावर हल्ला करण्यासाठी धावतात. काही प्राणी शांत असतात. त्यामध्ये पाळीव कुत्र्यांचा (dog monkey fight) सुध्दा समावेश होतो. त्याचबरोबर काही माकडांचा सुध्दा समावेश होता. कुत्रा आणि माकडाला जोपर्यंत कुणी डिवचत नाही, तोपर्यंत ते शांत असतात. पण दोघांनाही एकदा राग आला की, ते थेट हल्ला करतात. माकडाचा आणि कुत्र्यांचा तो किस्सा तुम्ही ऐकला असेल, माकडांनी २०० कुत्र्यांना ठार मारले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ (trending video news) लोकांना अधिक आवडल्यामुळे पुन्हा-पुन्हा पाहत आहेत.
त्या माकडाने काळी पॅन्ट घातली आहे
त्या व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळत आहे की, कुत्रा आणि माकड एकमेकांच्या विरोधात कशा पद्धतीने उभे आहेत. काहीवेळाने दोघ एकमेकांच्या विरोधात भांडायला सुरुवात करतात. माकडं कुत्र्याच्या अंगावर असं काही तुटून पडलं आहे की, गोल फिरवल्यानंतर शांत बसलं आहे. माकडाने कुत्र्याला अधिक दमवले आहे. त्या माकडाने काळी पॅन्ट घातली आहे. कुत्र्याचं डोकं त्याने जोराचं पकडलं आहे. त्याचवेळी ते माकडं कुत्र्याच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करीत आहे. कुत्रा त्यावेळी ओरडत होता, परंतु माकड त्याला सोडत नव्हते.
View this post on Instagram
त्या खतरनाक भांडणाचा शेवट दाखवलेला नाही. परंतु ही गोष्ट आहे की, माकड कुत्र्याला भारी पडलं आहे. जनावरांचं हे जबरदस्त भांडणं सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरती व्हायरल झालं आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत ३४ हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे. त्या व्हिडीओला लोकं मजेदार कमेंट सुध्दा करीत आहेत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची लोक अशी मजा घेत आहेत.