लग्नाच्या एक दिवस आधी नवरी पळून गेली, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, वाह पोरी वाह…

घरात लग्नाची तयारी सुरू होती. मंडप टाकला होता. हळदीचा कार्यक्रमही दणक्यात झाला होता. आता दुसऱ्या दिवशी वरात येणार होती आणि धुमधडाक्यात लग्न लागणार होतं. पण त्याआधीच नवरी मुलीने घरातून पलायन केले अन्...

लग्नाच्या एक दिवस आधी नवरी पळून गेली, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल, वाह पोरी वाह...
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 1:49 PM

लखनऊ : एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. लग्नाची सर्व तयारी झालेली असताना आणि दुसऱ्या दिवशी लग्न होणार असतानाच नवरीने (bride ran away from home) घरातून पलायन केलं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. तिची शोधाशोध सुरू झाली. नको नको ते तर्क लढवून शेजारीपाजारी, नातेवाईकांनी या मुलीची बदनामी करण्यास सुरुवात केली. पण नंतर जेव्हा तिच्या पळून जाण्याचं कारण समजलं तेव्हा सर्वचजण तिचे कौतुक करू लागले. तुम्हीही जेव्हा हे कारण ऐकाल तेव्हा वाह पोरी वाह म्हटल्याशिवाय राहणार नाहीत.

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील ही घटना आहे. या तरुणीचं लग्न 3 जून रोजी होणार होतं. मिर्जापूर येथील एका तरुणासोबत तिचं लग्न होणार होतं. मात्र, लग्नाच्या एक दिवसाआधीच तिनं घरातून पोबारा केला. त्यामुळे तिच्या आईवडिलांसह पै पाहुण्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर या सर्वांनी मिळून नवरीचा प्रत्येक ठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केली. नातेवाईकांची घरे, तिच्या मैत्रिणींची घरे, रेल्वे स्थानके, बस डेपोसह अनेक ठिकाणी शोध घेतला. त्यातच या मुलीच्या अफेअरच्या चर्चाही सुरू झाल्या. कुणासोबत तरी ती पळून गेली असेल, कुणासोबत तरी लफडं असेल अशी चर्चा सुरू झाली. घरच्यांनी मग थेट पोलीस स्टेशन गाठून मुलगी हरवल्याची तक्रारही नोंदवली.

दुसऱ्या मुलीचं लग्न लावून दिलं

त्यानंतर आपल्या घराची इज्जत वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलीचा त्याच मंडपात विवाह लावून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. नवरदेवाला आणि त्याच्या घरच्यांना झालेला प्रसंगही सांगितला. तसेच दुसऱ्या मुलीचं लग्न लावून देण्यास तयार असल्याचंही सांगितलं. नवरा मुलगा आणि त्याच्या घरचेही या प्रस्तावावर सहमत झाले आणि धुमधडाक्यात लग्न पार पडलं.

गावच्या शाळेत सापडली

पोलिसांनीही एव्हाना या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी गावातील प्रत्येक घर शोधलं. शेतातही शोधाशोध सुरू केली. आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातही कळवलं. तसेच गावातील शाळेत जाऊन शोध घेतला असता प्राथमिक विद्यालयाच्या एका खोलीत ही मुलगी लपलेली दिसली. पोलिसांनी तात्काळ तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिचं पळून जाण्याचं कारण विचारलं. त्यावेळी तिने जे कारण दिलं त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मला शिकायचंय. मला यूपीएससी करायची आहे. पण घरच्यांनी माझं जबरदस्ती लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला, असं या मुलीने सांगताच सर्वांनाच धक्का बसला.

आईलाही सांगितलं होतं...

मी आयएएसची तयारी करत असल्याचं मी आधीच आईला सांगितलं होतं. पण तरीही कोणी माझं ऐकलं नाही. मी लग्न करावं म्हणून माझ्यावर दबाव टाकत होते. पण इतक्यात लग्न करणं मला मंजूर नव्हतं. मला माझं आयुष्य खराब करायचं नव्हतं. त्यामुळेच मी घरातून पळून गेले, असं या मुलीने सांगितलं. मी माझ्या मनाने घरातून पळून गेले होते. मला कुणीही उकसवले नाही, असंही तिने सांगितलं. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा अजून तपास करत आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.