VIDEO | चुकून व्यक्ती हत्तीच्या परिसरात पोहोचला, संतापलेला हत्ती पाठी लागला, व्हिडिओ पाहणाऱ्यांना घाम फुटला

Elephant Viral Video : आतापर्यंत ही गोष्ट समजली नाही की, हत्तीला इतका राग का आला आहे. त्या व्यक्तीची चुकी आहे की, ती व्यक्ती हत्तीच्या परिसरात पोहोचली होती.

VIDEO | चुकून व्यक्ती हत्तीच्या परिसरात पोहोचला, संतापलेला हत्ती पाठी लागला, व्हिडिओ पाहणाऱ्यांना घाम फुटला
Elephant Viral VideoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 12:55 PM

मुंबई : जंगलात भटकंती करणारे काही प्राणी शांत असतात, तर काही प्राणी तात्काळ हल्ला करतात. काही इतके शांत असतात की, ते जंगलात एखादी गोष्ट घडत असेल तर ती पाहत बसतात. परंतु तुम्ही एखाद्या प्राण्याचा (Animal Viral Video) त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर तो प्राणी तुमच्यावर हल्ला केल्याशिवाय राहत नाही. तसाचं एक प्राणी हत्ती आहे. तो तात्काळ कधीचं कोणावर हल्ला करीत नाही. हत्तीला तुम्ही वारंवार त्रास द्यायला सुरुवात केली, तर तो हत्ती तुम्हाला अजिबात सोडत नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीच्या पाठी हत्ती (Elephant Attack Man Viral Video) लागला आहे. त्यानंतर काय झालंय हे तुम्ही व्हिडीओत पाहा.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, हत्ती त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागला आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती सुध्दा हत्तीला घाबरुन पुढे पळत आहे. ज्यावेळी हत्ती पाठी लागला, त्यावेळी त्या व्यक्तीला इतकी भीती वाटली आहे की, तो पुर्ण ताकदीने पुढे पळत आहे. त्याचबरोबर पळत असताना त्याची खाली जात असलेली पॅन्ट सुद्धा हातात घेऊन पळत आहे. ज्यावेळी तो हत्तीच्या परिसरातून बाहेर येतो. त्यावेळी तो हत्ती शांत झाला आहे. त्यानंतर घाबरलेली व्यक्ती दोनवेळी पुढच्या खड्ड्यात पडली आहे. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी ती व्यक्ती तिथं असलेल्या गाडीकडं जात आहे.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत ही गोष्ट कळाली नाही की, हत्तीला राग का आला आहे. लोकं अशी म्हणतं आहे की, हत्तीच्या परिसरात ती व्यक्ती गेल्यामुळे हत्तीला राग आला आहे. त्यामुळे हत्तीने त्या व्यक्तीला शिक्षा दिली आहे.

पळाला म्हणून वाचला

हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. समजा ती व्यक्ती पळाली नसती, तर हत्तीने त्याच्यावर गंभीर हल्ला केला असता. कारण एखाद्या हत्तीला राग आल्यानंतर त्याला शांत करणं अधिक अवघड असतं. हा व्हिडीओ तामिळनाडू राज्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. ती व्यक्ती हत्तींच्या परिसरात का गेली होती, हे सुध्दा समजलेलं नाही.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.