1985 सालचं हे हॉटेल बिल! शाही पनीर नुसतंच नावाला “शाही”, इतकं स्वस्त! डोक्याला हात लावाल

| Updated on: Nov 20, 2022 | 3:40 PM

हे पिवळे बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे बिल १९८५ सालचे असल्याचे दिसून येते. शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटीचे बिल यात देण्यात आले आहे.

1985 सालचं हे हॉटेल बिल! शाही पनीर नुसतंच नावाला शाही, इतकं स्वस्त! डोक्याला हात लावाल
paneer shahi 1985 price
Image Credit source: Social Media
Follow us on

सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या पाहुण्यासोबत जेव्हा आपण जेवायला जातो तेव्हा आपल्याला मस्त काहीतरी स्वादिष्ट खायची इच्छा होते. पण महागाई किती वाढलीये ना? आपल्याला मग पाहुणे आले तरी सगळ्या गोष्टींचा हिशोब लावावा लागतो. हिशोब नाही लावला तर सगळं बजेट बिघडतं. हे सगळं जुन्या काळातही होत असेल का? जुनी लोकं पण हॉटेलमध्ये जात असतील का पाहुणे आल्यावर? हा एक फोटो व्हायरल होतोय ज्यात 1985 सालचं हॉटेलचं बिल आहे. आधीच्या काळात गोष्टी किती स्वस्त होत्या हे बिल पाहून कळतं.

आजकाल सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हॉटेलच्या बिलाचा तपशील छापला गेलाय. हे 1985 सालचे बिल आहे. तेव्हा कशाची काय किंमत काय होती हे यात दिसून येतंय.

हे पिवळे बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे बिल 1985 सालचे असल्याचे दिसून येते. शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटीचे बिल यात देण्यात आले आहे.

या गोष्टींची किंमतही लिहिण्यात आली आहे. त्यावेळी शाही पनीर फक्त 8 रुपयांना होतं, तर दाल मखनी आणि रायता अवघ्या ५ रुपयांत मिळत होता.

एवढेच नव्हे तर भाकरीची किंमत केवळ 70 पैसे होती. हे संपूर्ण बिल 26 रुपये 30 पैसे असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे त्यात दोन रुपये सेवाशुल्कही जोडले आहेत.

1885 hotel bill

याचा अर्थ असा की हे एक चांगले रेस्टॉरंट बिल आहे. हे बिल व्हायरल होताच लोकांना त्या काळात खाद्यपदार्थांची किंमत किती आहे, याचा अंदाज लागलाय.

ते व्हायरल होताच लोकांनी त्याची तुलना आजच्या किमतीशी करायला सुरुवात केली. एकीकडे शाही पनीरची किंमत 1985 मध्ये 8 रुपये होती, तिथे आज त्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

वेगवेगळ्या हॉटेल्सचे दर वेगवेगळे आहेत, पण ते अनेक पटींनी वाढले आहेत. सध्या हे जुनं बिल प्रचंड व्हायरल होतंय.