मुंबई: पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक नवं कोडं. हे कोडं म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. ऑप्टिकल भ्रम खूप किचकट असतात. अशा पद्धतीची कोडी सोडवायची असतील तर तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. याआधी सुद्धा आम्ही तुम्हाला अनेक कोडी सोडवायला लावली ज्यात कधी तुम्हाला एखादी लपलेली वस्तू शोधायला सांगितली गेली तर कधी दोन चित्रांमधील फरक शोधायला सांगितला गेला. ज्या लोकांचं निरीक्षण चांगलं होतं त्यांना याचं उत्तर लगेच शोधता आलं. रोज जर तुम्ही ही कोडी सोडवत असाल तर तुम्हाला सुद्धा याचा नक्कीच सराव झाला असेल. आता हे चित्र बघा…
या चित्रात तुम्हाला एकच अंक दिसतोय. जो अंक दिसतोय त्या अंका व्यतिरिक्त इथे आणखी एक अंक आहे. होय, इथे दिसताना सगळीकडे 8 दिसेल पण या चित्रात तुम्हाला 3 हा अंक शोधायचा आहे. आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? शक्य आहे. तुम्हाला फक्त हे चित्र नीट निरखून बघायचं आहे. नीट पाहिलं तर तुम्हाला याचं उत्तर शोधणे सहज शक्य आहे. तुम्हाला याचं उत्तर मोजून दहा सेकंदात शोधायचं आहे.
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. आता इथे तुम्हाला फक्त एकच अंक दिसतोय, 8. या अंकांमध्ये तुम्हाला शोधायचा आहे 3 हा अंक. एक-एक ओळ वरून खाली बघा, तुम्हाला हे करताना पटकन करायचं आहे. जितकं फास्ट तुम्ही याचं उत्तर शोधाल तितका तुम्हाला फायदा आहे. लक्षात ठेवा, फास्ट बघायचं आहे पण एकही अंक सोडायचा नाहीये. आता तुम्हाला ३ हा अंक दिसलाय का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली दाखवत आहोत.