पोलिसांनी दाखवला इंगा! शिक्षा दिली, व्हिडीओ टाकला बाकी पोरं पण घाबरली
हे तरुण मोटारसायकलवरून फिरून मोठ्या आवाजात भोंगा वाजवत होते. लोकांकडे जाऊन त्यांना त्रास देत होते.
क्रिकेटच्या मैदानात सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक असोत किंवा जत्रेला भेट देणारे तरुण असोत… आजकाल या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे ते प्लास्टिकचा भोंगा वाजविणे. लोकांना हे वाजविण्यात इतकी मजा वाटते. मोठमोठ्याने भोंगा वाजविल्याने लोकांना या आवाजाचा त्रास होतो.आजकाल दसरा, नवरात्रीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जत्रा भरवल्या जात असताना विनाकारण भोंगा वाजवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांची जास्त गर्दी असते. जबलपूर जिल्ह्यातील गढ़ा पोलीस ठाणे परिसरात काही तरुण भोंगा वाजवून लोकांना त्रास दिसल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी या टवाळखोरांना चांगलीच शिक्षा दिलीये.
हे तरुण मोटारसायकलवरून फिरून मोठ्या आवाजात भोंगा वाजवत होते. लोकांकडे जाऊन त्यांना त्रास देत होते.
4 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी लोकांना त्रास देणाऱ्या अशा खोडकर तरुणांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. अनेक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
कुणाच्या कानशिलात लगावली, कुणाला उठाबशा काढायला लावल्या, कुणाला कान पकडून उभं राहायला लावलं तर कुणाला माफी मागायला लावली.
काहींना एकमेकांच्या कानशिलात मारायला सांगितली. एक शिक्षा तर अजबच होती पोलिसांनी भोंगा घेतला आणि एकाच्या कानाला लावला, दुसऱ्याला फुंकर मारायला सांगितली. लोकांना आवाजाचा किती त्रास होतो याची जाणीव करून देण्यासाठी ही युक्ती.
या सगळ्याचा व्हिडीओ काढण्यात आला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. आता प्लास्टिकचा भोंगा वाजविणारी जनता चांगलीच घाबरलीये.
हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. ही क्लिप ट्विटरवर शेअर करत @BiharTeacherCan लिहिले- “और बजाओ भोंपू….”
और बजाओ भोंपू ? pic.twitter.com/SDfJyRCBcP
— Educators of Bihar (@BiharTeacherCan) October 6, 2022
व्हिडिओला 20 हजार लाईक्स आणि 7 लाख 68 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, यावर शेकडो युजर्सनी आपला फिडबॅक दिला आहे.