देशात किंवा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? किती संपत्ती वैगरे अशा पद्धतीच्या माहिती आपण वाचल्या आहेत. पण आता अशाच एका श्रीमंत व्यक्तीबद्दल सध्या चर्चा होताना दिसत आहे. पण ही व्यक्ती कोणी उद्योगपती किंवा कोणत्या कंपनीचा मालक नाहीये तर हा चक्क भिखारी आहे. होय, बरोबर वाचलंत तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्याबद्दल कदाचितच तुम्ही ऐकलं असेल. ज्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे.
जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळख
जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळख असलेला भिकारी मुंबईत राहतो आहे आणि ज्याची संपत्ती सात कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आझाद मैदान दरम्यानच्या गजबजलेल्या रस्त्यावर भीक मागून भरत जैन नावाचा एक व्यक्ती चक्क करोडपती झाला आहे. भरत हा जगातील सर्वात श्रीमंत भिकारी असल्याचे म्हटले जाते. त्यांची मुंबई आणि पुण्यात करोडो रुपयांची घरे आणि दुकाने आहेत. त्याची मुले कॉन्व्हेंट शाळेत शिकतात आणि तो 1.25 कोटी रुपयांच्या घरात राहतो.
एका रिपोर्टनुसार, भरत जैनचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूपच कमकुवत होते. त्याच्याकडे जेवायला आणि डोक्यावर छप्पर नव्हते. त्यामुळे भरतला अभ्यास करता आला नाही. पण याच परिस्थितीत राहून भरतने त्याचे नशीब बदलले आणि आज त्याच्याकडे 7.5 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती आहे. ज्यामध्ये अनेक मालमत्ता आणि उत्पन्नाचा समावेश आहे, जे कदाचित कार्यालयात जाणाऱ्या सरासरी कर्मचाऱ्यापेक्षाही जास्त आहे.
भिक मागून महिन्याला 60 हजार ते 75 हजार रुपये कमावतो
आता भरती परिस्थिती सुधारली आहे त्यामुळे घरच्यांनी वारंवार नकार देऊनही भरत जैन भीक मागतच राहतो. जैन 40 वर्षांहून अधिक काळ भीक मागत आहेत. त्यांची दैनंदिन कमाई 2,000 ते रु. 2,500 पर्यंत आहे असं म्हटलं जातं. कोणत्याही ब्रेकशिवाय 10 ते 12 तास काम करून जैन याने त्याचा दिनक्रमच असा ठरवला आहे की त्याची मासिक कमाई 60 हजार ते 75 हजार रुपयांपर्यंत होते.
1.4 कोटी रुपयांची मालमत्ता
भरतची संपत्ती नुसती भीक मागून आली नाही, तर त्यांचे आर्थिक यशही त्यांनी केलेल्या शहाणपणामुळेच मिळाले. त्याच्याकडे मुंबईत 1.4 कोटी किमतीचे 2 फ्लॅट आहेत, जिथे तो त्याची पत्नी, दोन मुले, वडील आणि भावासह राहतो. याशिवाय ठाण्यात 2 दुकाने असून, त्यातून त्याला दरमहा 30 हजार रुपये भाडे मिळते.
कुटुंबात कोण कोण आहेत?
भरतला दोन मुलगे आहेत, ते चांगल्या कॉन्व्हेंट शाळेत शिकले आहेत आणि आता ते कौटुंबिक व्यवसायात मदत करतात. भरतचे कुटुंब स्टेशनरीचे दुकान चालवते, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न आणखी वाढतच चालल आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की कुटुंबीय त्याला भीक न मागण्याचा सल्ला देतात, पण ते तो मान्य करत नाहीत. तो आपल्या निर्णयावर ठाम असून “मला भीक मागायला आवडते त्यामुळे मी ते सोडणार नाही” असही तो म्हणाला आहे.