मुंबई: अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हा लोकांसाठी एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. यावर लोक अनेक प्रकारचे व्हिडीओ टाकत असतात. डान्सचा व्हिडीओ असो, गाण्याचा असो किंवा अजून कुठलंही टॅलेंट असो लोकांना ते सोशल मीडियावर टाकायला आवडतं. हे व्हिडीओ मग लोक शेअर करतात. इंस्टाग्राम, फेसबुक हे आणि असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावर लोक व्हिडीओ टाकून फेमस झालेत. सोशल मीडियाने अनेक लोकांना श्रीमंत बनवलं. यावर तर डान्सचे व्हिडीओ टाकणारे लोक टीव्हीवरच्या रिऍलिटी शो साठी बोलावले जातात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक मुलगा खूप सुरेख गातोय.
अरिजित सिंगचं एक गाणं आहे. कर्नाटक मधला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ ३० लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केलाय. व्हिडीओ बघून लोक म्हणतायत, ” तुमचा आवाज खूप सुंदर आहे”, काही म्हणतात, “तुम्ही चुकीच्या बसमध्ये बसला आहात, गाण्याच्या बसमध्ये बसा.” ‘तू मेरा कोई ना होके भी कुछ लगे’ हे गाणं तर तुम्ही ऐकलंच असेल. हे गाणं प्रचंड फेमस आहे, ते रिलीज होताच लोकांनी या गाण्याला डोक्यावर घेतलं.
व्हिडीओ मध्ये एक मुलगा बसमधील सीटवर बसलाय. तो प्रवास करतोय, कदाचित प्रवासात काहीतरी टाइमपास म्हणून त्याने हा व्हिडीओ काढला असेल. या व्हिडीओ मध्ये तो अरिजित सिंगचं फेमस असलेलं ‘तू मेरा कोई ना होके भी कुछ लगे’ गाणं गातो. हे गाणं तो इतका मन लावून म्हणतो की तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल. त्याचं गाणं संपलं की सगळे टाळ्या वाजवतात.