मौसम बदल रहा है, थंडीला सुरुवात, दिवस छोटा अन् रात्र मोठी, राज्यात थंडीची काय स्थिती?
राज्यातील विविध भागात हवामानात बदल होत असल्याचे दिवस लहान आणि रात्र मोठी होत आहे.
मुंबईः राज्यात दोन दिवसांनंतर थंडीचा (Winter) कडाका वाढला आहे. मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्र परिसरातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमान घसरू लागले आहे. आज रविवारी रात्रीही अनेक भागात थंडी (Cold) पडल्याने नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतला. राज्यातील काही भागात अजूनही तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बंगालच्या उपसागरानंतर सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाळी स्थिती आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे. काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमान वाढले आहे. पुढील दोन दिवसात पुन्हा रात्रीच्या तापमानात घट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग सोडला तर उर्वरीत बहुतांश ठिकाणी पहाटेचा गारवा, धुके अनुभवायला मिळत आहे. राज्याचं आजचं किमान तापमान 13 ते 23 अंशांच्या आसपास पहायला मिळालं. तर कमाल तापमान 30 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे.
संपूर्ण राज्यातील तापमानात कुठे कुठे चढ-उतार पहायला मिळाल तरीही एकूण हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
13 Nov, Parts of #Pune and adj #ahmednagar areas the min temp could drop to 12°C around on Monday morning, as per the IMD GFS guidance for min temperature. The trend is likely to continue for next 3,4 days pic.twitter.com/UkmJw9Zbpw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 13, 2022
हवामान विभागातील शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार, रविवारी सकाळपर्यंत विविध ठिकाणी नोंदवलेले तापमान असे-
सोलापूर- 17.7
उदगीर- 15
सातारा- 15
कोल्हापूर- 17.2
मालेगाव- 17.2
उस्मानाबाद- 16.4
नाशिक- 14.3
नांदेड- 16.4
जळगाव- 17
पुणे- 13.3
जालना- 16.2
औरंगाबाद- 14.2
बारामती- 13.9
परभणी- 15.5
सांगली- 16.9
राज्यातील विविध भागात हवामानात बदल होत असल्याचे दिवस लहान आणि रात्र मोठी होत आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 13, 2022