दिवाळी किराणा सामान कीट : फक्त 100 रूपयांत मिळणार 4 वस्तू, यासह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आमदारांना गाजर दाखवून शांत केलं जात आहे. तर पुढील 6 महिने मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचेही राऊत म्हणाले.
राज्य शासनाने घोषित केलेल्या दिवाळी किराणा सामान कीट उद्यापासून मिळणार सर्वसामान्यांना. फक्त 100 रूपयांत मिळणार 4 वस्तू. यादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. पेडणेकर यांनी, स्वत: चा फोटो हा त्या कीटवर टाकायचा होता म्हणून राज्यभर कीट वाटण्याचे राखून ठेवलं. तर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो वापरायचेही ते विसरले असा टोला लगावला आहे. यादरम्यान अनेक वर्षांपासून महामंडळांच्या नियुक्त्या या रखडल्या आहेत. त्यालवकरच होणार असल्याचे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आमदारांना गाजर दाखवून शांत केलं जात आहे. तर पुढील 6 महिने मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचेही राऊत म्हणाले. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी घराच्या बाहेर लाठ्या-काठ्या आणि दगड, स्टंप आणि बाटल्या आढळून आल्या. याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. तर या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव याने केला आहे.