“आमचं ठरलंय, अजित पवार यांचं सूचक विधान; “आगामी निवडणूका आम्ही…”
आगामी निवडणुकांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही काळजी करू नका, "आमचं ठरलंय, आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत", असं अजित पवार म्हणाले आहेत. "राष्ट्रवादी काँग्रेमध्ये विलास लांडे हे आमदार होते, त्यांना मी महापौर केलं होतं.
पुणे: आगामी निवडणुकांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. तुम्ही काळजी करू नका, “आमचं ठरलंय, आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेमध्ये विलास लांडे हे आमदार होते, त्यांना मी महापौर केलं होतं. खासदारकीची उमेदवारी दिली होती, मात्र त्यांना अपयश आलं होतं. आता त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, आता तिथे अमोल कोल्हे आहेत. कोल्हे काय म्हणाले मी ऐकल आहे. हा आमचा घरातला प्रश्न. ४८ जागा कुठल्या पक्षाला जाणार ते आधी ठरेल. उमेदवार तोडीस तोड लढेल का याची चाचपणी व्हावी अशी मागणी आहे. अजून एक वर्ष, आम्ही आधी तयारीला लागलो”, असं अजित पवार म्हणाले.
Published on: Jun 02, 2023 01:18 PM
Latest Videos