अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर अंत्यसंस्कार नाही अन् दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर अंत्यसंस्कार नाही अन् दफनविधीला विरोध, कुटुंबियांची वणवण

| Updated on: Sep 27, 2024 | 11:09 AM

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना कळवा आणि अंबरनाथ येथेही दफन विधीसाठी जागा मिळालेली नाही. मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबियांची मात्र वणवण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर तीन दिवस उलटून गेलेत. मात्र अद्याप त्याच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. कळवा येथे मनसेने अक्षय शिंदेच्या दफन विधीसाठी जमीन देण्यास विरोध केलाय. मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबियांनी जमिन मिळत नाहीये. अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमीची पाहणी केल्यानंतर अंबरनाथ नगरपरिषदेत अर्जही केला. पण अधिकारी नसल्याने पत्रावर सहीच मिळाली नसल्याचे अक्षय शिंदेच्या वडिलांचं म्हणणं आहे. मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबियांची वणवण सुरू आहे. आधी कळवा येथे अक्षयचा दफनविधी करण्याचा प्रयत्न कुटुंबियांनी केला. मात्र मनसेने कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळालं. तर दुसरीकडे अक्षयच्या वडिलांनी एन्काऊंटरवरून पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली. तसं पत्रच अक्षयच्या कुटुंबियांनी मुंब्रा पोलिसात दिलंय. ते पत्र मुंब्रा पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास करणाऱ्या सीआयडी पथकाकडे सुपुर्द केलं आहे.

Published on: Sep 27, 2024 11:09 AM